Paris Olympic 2024 Lakshya Sen sakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 Live : असं कोण खेळतं का राव! Lakshya Sen चा बॅकहँड शॉट्स अन् अव्वल खेळाडू गार Video

Paris Olympic 2024 India मनु भाकरच्या दोन कांस्यपदकानंतर नेमबाज स्वप्नील कुसळे याने आणखी एका पदकाची आशा निर्माण केली आहे.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Lakshya Sen : मनु भाकरच्या दोन कांस्यपदकानंतर नेमबाज स्वप्नील कुसळे याने आणखी एका पदकाची आशा निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्य सेनचा अविश्वसनीय खेळ पाहायला मिळाला. बिगरमानांकित लक्ष्यने त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक तगड्या प्रतिस्पर्धीला तो सहज चितपट करत आहे. पण, बुधवारी त्याने तिसऱ्या मानांकित आमि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या जॉनथन ख्रिस्टी याला पराभवाचा धक्का दिला.

पहिल्या सेटमध्ये २-८ अशा पिछाडीवर असलेला लक्ष्य न खचता मोठ्या धैर्याने प्रतिस्पर्धीचा मुकाबला करताना दिसला. अविश्वसनीय बचाव अन् तितकाच कौशल्यपूर्ण आक्रमण... याच्या जोरावर लक्ष्यने जॉनथनला सैरभैर केले. पहिला सेट २१-१८ असा जिंकून त्याने सामन्यावर पकड घेतली. पण, तरीही तो निर्धास्त झाला नाही, त्याचे ध्येय हे विजय मिळवणे हेच होते आणि त्यासाठी त्याने इंडोनेशियाच्या खेळाडूला संघर्ष करण्यास भाग पाडले.

लक्ष्यने मारलेला बॅकहँड परतीचा फटका सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतोय... हा फटका त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये २१-१२ अशी बाजी मारताना उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि त्याच्यासमोर भारताच्या एचएस प्रणॉयचे आव्हान असण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, महिला एकेरीत पी व्ही सिंधूने इस्टानियाच्या क्रिस्टीन कुबाचा २१-५ व २१-१० असा सहज पराभव केला.

लक्ष्य सेन कोण?

लक्ष्य सेन याचा जन्म हा उत्तराखंड येथील अलमोडा गावातला. त्याचे वडील डी.के.सेन बॅडमिंटन प्रशिक्षक असून भाऊ चिराग सेन हा सुद्धा बॅडमिंटनपटू आहे. लक्ष्य फेब्रुवारी २०१७ मध्ये बी.डब्ल्यू.एफ.जागतिक ज्युनिअर रँकिंगमध्ये एकेरी खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर आला. २०१८ मधील आशियायी कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल सीडेड कुनालावूत विदितसर्नला हरवून लक्ष्यने विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT