Manu Bhaker - Sarabjot Singh | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic: मनू भाकरची नजर पुन्हा ब्राँझ मेडलवर, सरबज्योतसह तिसऱ्या जागेसाठी साधणार निशाणा! अर्जून-रिदम क्वालिफायर्समधून बाद

Paris Olympic 2024 Shooting : १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात भारताची सरबज्योत सिंग-मनू भाकर यांची जोडी कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरली आहे.

Pranali Kodre

Manu Bhaker - Sarabjot Singh in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी नेमबाजीतील १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकाराची क्वालिफायर झाली. या प्रकारात भारताच्या सरबज्योत सिंग-मनू भाकर आणि अर्जुन सिंग - रिदम सांगवान या दोन जोड्या उतरल्या होत्या.

या क्वालिफायर्समध्ये सरबज्योत सिंग-मनू भाकर या जोडीने तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे ते कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. मात्र अर्जून सिंग - रिदम सांगवान या भारतीय जोडीला मात्र पहिल्या चार जोड्यांमध्ये स्थान मिळवता न आल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. त्यांची जोडी क्वालिफायर्समध्ये १० व्या क्रमांकावर राहिली.

सोमवारी झालेल्या क्वालिफायर्समध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना थेट सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची संधी होती. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणारे संघ कांस्य पदकाचा सामन्यासाठी पात्र ठरतात.

यानुसार सोमवारी झालेल्या क्वालिफायर्समध्ये तुर्कीची तर्हन सेव्वल इलायदा आणि युसूफ डिकेक ही जोडी 582-18x गुणांसह अव्वल क्रमांकावर राहिली. तसेच सार्बियाची झोराना डामिर मिकेच यांची जोडी 581-24x गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्या जोडीने 580-20x गुण मिळवले, तर कोरियाची ये जीन ओह - वोन्हो ली ही जोडी 579-18x गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिली.

त्यामुळे आता तुर्की आणि सार्बिया यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल, तर भारत आणि कोरिया संघात कांस्यपदकासाठी लढत होईल. या लढती मंगळवारी होणार आहेत.

अर्जुन सिंग - रिदम सांगवान या जोडीने 576-14x गुण मिळवून १० व्या क्रमांकावर राहिली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मनू भाकरने याआधीच रविवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे. ती नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची एकूण ५ वी खेळाडू, तर पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

आता तिला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तिने जर मंगळवारी मिश्र सांघिक प्रकारातही कांस्य पदक जिंकले, तर ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी भारताची पहिली आणि एकमेव महिला खेळाडू ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT