Arshad Nadeem Sakal
क्रीडा

Video Viral: मला साथ द्या... अर्शद नदीम पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होता अन् बाजूने येत होता घोरण्याचा अवाज

Arshad Nadeem Viral Video: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमने पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात घोरण्याचा आवाज येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Arshad Nadeem Viral Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. त्याने ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले. त्यामुळे तो ऍथलटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकून देणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला.

दरम्यान, यानंतर आता त्याचा पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कोणाच्यातरी घोरण्याचा आवाज येत असल्याने अनेक सोशल मिडिया युजर्सने त्याची खिल्ली उडवली आहे.

या व्हिडिओमध्ये नदीमने म्हणाला, 'पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी पाकिस्तानी लोकांना विनंती करतो की आपण एकतेने राहू अशी प्रतिज्ञा करू. जसे ८ ऑगस्टला मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलयानंतर पाकिस्तानमध्येच नाही, तर जगातील पाकिस्तानी लोकांमध्येही आनंदाची लहर पसरली होती. मी माझ्या सोशल मीडियावर १४ ऑगस्टसाठी प्रोफाईल फोटो बदलला आहे, ज्यात लिहिलंय आम्ही एकतेने उभे राहू. तसे तुम्ही आपले प्रोफाईल फोटो बदला.'

मात्र हे नदीम बोलत असताना त्याचा आजूबाजूला कोणीतरी घोरताना आवाज येत होता. त्याबाबत कमेंट्स यायला लागल्यानंतर नदीमने तो व्हिडिओ डिलिट केला. पण तोपर्यंत तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नदीमवर कौतुकाचा वर्षाव

सध्या पाकिस्तानमध्ये नदीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याला पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी त्याला पाकिस्तानी चलनानुसार १० कोटींचा चेक आणि होंडा सिवीक ब्रँडची कार भेट दिली आहे.

रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान सरकारकडून नदीमला पाकिस्तानी चलनानुसार १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्याला पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार हिलाल-ए-इम्तियाज देखील देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT