paris olympics 2024 100m sprinter st lucia julien alfred wins motivation from usain bolt video sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : सेंट ल्युशियाची ज्युलियन ठरली वेगवान; बोल्टच्या विजयी शर्यतीचे व्हिडिओ पाहून मिळवले प्रोत्साहन

विश्वविजेतेपदानंतर आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे शा कारीचे स्वप्न भंगले, तसेच महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा अमेरिकन धावपटूंचा दुष्काळ आणखी चार वर्षे वाढला.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : अंतिम शर्यतीपूर्वी झालेला पाऊस, त्यामुळे काहीशा आल्हाददायक वातावरणात महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सातव्या लेनमध्ये असलेल्या विश्वविजेत्या अमेरिकेच्या शा कारी रिचर्डसनवर सर्वांच्या नजरा होत्या, मात्र १०.७२ सेकंदात शर्यत संपली त्या वेळी कॅरेबियन बेटावरील सेंट ल्युशियाची ज्युलियन अल्फ्रेड ही नवीन विजेती म्हणून उदयास आली.

विश्वविजेतेपदानंतर आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे शा कारीचे स्वप्न भंगले, तसेच महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा अमेरिकन धावपटूंचा दुष्काळ आणखी चार वर्षे वाढला.

अंतिम शर्यतीपूर्वी मी उसेन बोल्टच्या अनेक प्रसिद्ध विजयी शर्यतींचे व्हिडिओ पाहिले व त्यातून मला प्रोत्साहन मिळाले, अशी कबुली ज्युलियनने शर्यतीनंतर दिली. या सुवर्णपदकामुळे ती ऑलिंपिकमध्ये केवळ पदकच नव्हे, तर सुवर्णपदक जिंकणारी सेंट ल्युशियाची पहिली खेळाडू ठरली आहे.

यंदा विश्व इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ६० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या २३ वर्षीय ज्युलियनने सहाव्या लेगमधून धावताना उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीतही वेगवान प्रारंभ केला. उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीतही शा कारीचा प्रारंभ संथ होता.

शेवटच्या ३० मीटरमध्ये शा कारीने वेग वाढविला, मात्र तोपर्यंत अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात शिक्षण घेत असलेली ज्युलियन एक मीटरपुढे निघून गेली होती. अखेर तिने १०.७२ सेकंदाच्या आपल्या राष्ट्रीय विक्रमासह दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. ती आता २०० मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे.

शा कारीला १०.८७ सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्युलियनची सरावातील सहकारी अमेरिकेचीच मेलिसा जेफरसन १०.९२ सेकंदात ब्राँझपदकाची मानकरी ठरली. २००८ व १२ ची विजेती जमैकाची शेली ॲन फ्रेझर हिने उपांत्य फेरीतून माघार घेतली होती.

दरम्यान, ४-४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत नेदरलँडने प्राथमिक फेरीत विश्वविक्रम करणाऱ्या अमेरिकेवर मात करीत सुवर्णपदक जिंकले. अमेरिका संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गोळाफेकीत अमेरिकेच्या रायन क्रौझरने २२.९० मीटरवर गोळा फेकत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या तिहेरी उडीत डॉमनिका प्रजाकसत्ताकच्या विश्व इनडोअर स्पर्धेतील विजेत्या थिआ लेफाँडने १५.०२ मीटर कामगिरीसह आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

अल्फ्रेडची प्रमुख कामगिरी

  • २०१७ - १०० मीटर - कॉमनवेल्थ युथ गेम्स - सुवर्णपदक

  • २०१८ - १०० मीटर - युथ ऑलिंपिक - रौप्यपदक

  • २०२२ - १०० मीटर - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - रौप्यपदक

  • २०२३ - १०० मीटर - जागतिक स्पर्धा - पाचवे स्थान

  • २०२३ ०- २०० मीटर - जागतिक स्पर्धा - चौथे स्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT