Paris Olympic 2024 opening ceremony Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : आली खेळ घटी समीप... सीन नदीच्या तीरावर होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक उद्घाटनाची उत्सुकता

Paris Olympic 2024 opening ceremony news in marathi |संपूर्ण जगाला वेध लागलेल्या पॅरिस ऑलिंपिकचे उद्घाटन आता काही तासांवर आले आहे. आतापर्यंत झाला नसेल, असा उद्घाटन सोहळा उद्या सीन नदीच्या तीरावर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : संपूर्ण जगाला वेध लागलेल्या पॅरिस ऑलिंपिकचे उद्घाटन आता काही तासांवर आले आहे. आतापर्यंत झाला नसेल, असा उद्घाटन सोहळा उद्या सीन नदीच्या तीरावर होणार आहे. खुल्या आसमंतात होणारा हा सोहळा भव्यदिव्य आणि जगावेगळा करण्याचा घाट ऑलिंपिक समिती आणि फ्रान्स सरकारने घातला आहे. आतापर्यंतचे सर्व उद्घाटन सोहळे बंदिस्त स्टेडियममध्ये झाले होते; पण उद्याचा सोहळा इतिहास घडवेल, असे सांगितले जात आहे.

ऑलिंपिकचे महत्त्व आणि फ्रान्सची संस्कृती उद्घाटन सोहळ्यातील काही कार्यक्रमातून दाखवण्यात येणार आहे. सीन नदीच्या तिरावर प्रेक्षकांची सोय करण्यात येणार आहे आणि अर्थात सायंकाळ झाल्यावर विद्युत प्रकाशझोताची आतषबाजी लक्ष वेधून घेणारी असेल.

तरंगते संचलन

एरव्ही स्टेडियमध्ये होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी देशांच्या खेळाडूंचे संचलन प्रतिष्ठेचे, सन्मानाचे आणि आकर्षणाचेही असते. यावेळी सीन नदीवर आठ किमी अंतरावर बोटीतून खेळाडूंचे संचलन होणार आहे. त्यासाठी १०० बोटी असणार आहेत आणि त्यात जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

जगावेगळा होणारा हा उद्घाटन सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी तीन लाख लोकांना नदीच्या तीरावर प्रवेश देण्यात येणार होता; परंतु सुरक्षिततेच्या कारणावरून ही संख्या आता निम्म्यावर करण्यात आली आहे.

पावसाचा व्यत्यय येणार ?

नदीच्या तिरावर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी हवामानाचीही साथ मिळणे आवश्यक आहे, परंतु `वेदर डॉट कॉम`ने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या सायंकाळी हलक्या पावसाची ५० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आकाश अंशतः ढगाळ असणार आहे. मध्यम स्वरूपाचे वारे वाहणार असल्याने त्याचा त्रास होणार नाही.

सांस्कृतिक कार्यक्रमात कोण?

सहभागी होणार, याची माहिती उघड करण्यात आली नाही; परंतु लेडी गागा, सेलिन डायन, टेलर स्विफ्ट हे कलाकार आपली अदाकारी सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सचे जगप्रसिद्ध गायक अया नाकामुरा हिच्याही गाण्यांचा कार्यकम होणार असल्याचे समजते.

दृष्टिक्षेपात

  • सीन नदीच्या तीरावर होणार उद्घाटन

  • १० हजार खेळाडूंचा संचलनात सहभाग

  • १०० बोटींची व्यवस्था

  • आठ किमी अंतरापर्यंत चालणार संचलन

  • पॅरिसमधील वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार उद्घाटन सोहळा

  • भारतीय वेळेनुसार रात्री ११.०० वाजता

  • थेट प्रक्षेपण ः स्पोर्ट्स १८, जिओ सिनेमा

  • पी. व्ही. सिंधू, शरथ कमाल भारताचे ध्वजधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT