Paris Olympics 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिक हे माझे चौथे व अखेरचे ऑलिंपिक­; मनप्रीत सिंग

Manpreet Singh : माझे संपूर्ण लक्ष्य पॅरिस ऑलिंपिकवर असणार आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायचे. पदक जिंकायचे. हे सर्व खेळाडूंचे स्वप्न असते. मी चौथे ऑलिंपिक खेळतो आहे

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : पॅरिस ऑलिंपिक हे माझे चौथे व अखेरचे ऑलिंपिक असणार आहे, असे उद्‌गार भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य मनप्रीत सिंग याने याप्रसंगी काढले. मनप्रीत सिंग पीटीआय संस्थेशी संवाद साधताना म्हणाला, मी अजून निवृत्तीचा विचार केलेला नाही, पण पॅरिस हे माझे अखेरचे ऑलिंपिक असेल असे समजूनच मी मैदानात उतरणार आहे.

माझे संपूर्ण लक्ष्य पॅरिस ऑलिंपिकवर असणार आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायचे. पदक जिंकायचे. हे सर्व खेळाडूंचे स्वप्न असते. मी चौथे ऑलिंपिक खेळतो आहे. त्याचमुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

गरीबी अन्‌ संघर्ष

मनप्रीत सिंग याच्या कुटुंबीयांना हलाखीच्या दिवसामधून जावे लागले आहे. वडील कारपेंटर म्हणून दुबईत कामाला होते, पण वैद्यकीय समस्या उद्‌भवल्यामुळे त्यांना मायदेशी परतावे लागले. आई घर सांभाळायची. दोन भाऊही हॉकी खेळत होते, पण आर्थिक विवंचनेमुळे त्यांना या खेळापासून दूर रहावे लागले. अशा परिस्थितीवर मनप्रीत याने मात केली.

आरोपाचा काळ वाईट

भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक जोर्द मरीन यांनीही मनप्रीत सिंग याच्यावर आरोप करताना म्हटले की, मनप्रीत याने संघातील इतर खेळाडूंवर सुमार कामगिरी करण्याचा दबाव टाकला. जेणेकरून २०१८ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याच्या मित्रांना भारतासाठी खेळता येईल. या आरोपाबद्दल मनप्रीत म्हणाला, तो काळ अत्यंत वाईट होता. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हा माझा जवळचा मित्र होता. त्याला याबाबत सर्व काही सांगितले. आईने यामधून सावरण्यासाठी बळ दिले.

मनप्रीतच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा

- २०११ मध्ये १९व्या वर्षी पदार्पण

- टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ

- २०१४ व २०२२ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण

- मनप्रीत एम. एस. धोनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो व डेव्हिड बेकहॅम यांचा चाहता आहे. अन्‌ याच कारणामुळे सात क्रमांकाची जर्सी परिधान करतो.

आमचा गट खडतर

मनप्रीत सिंग पॅरिस ऑलिंपिकमधील स्पर्धेबाबत म्हणाला, आमच्या गटात एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक लढतीत सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. विश्‍वकरंडकात न्यूझीलंडकडून आमचा पराभव झालेला आहे. आयर्लंडने बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT