Paris Olympics 2024 Rishabh Pant reward for Neeraj Chopra sakal
क्रीडा

Neeraj Chopraने गोल्ड जिंकला की इकडे ऋषभ पंतकडून मोठे बक्षीस, १० जणांना आहे संधी, फक्त एक काम करा

नीरजसाठी टोकियोनंतर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 Neeraj Chopra : पॅरिस ऑलिंपिकमध्ये भालाफेकीची अंतिम फेरी गाठण्यासाठी 84 मीटरची पात्रता ठेवण्यात आली होती. ही पात्रता टोकियोतील सुवर्णपदक विजेत्या भारताच्या नीरज चोप्रासाठी जणू काही सरावाचाच भाग ठरली. त्याने पहिल्याच प्रयत्नात ही पात्रता पार केली आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली.

म्हणजेच आता त्याला टोकियोनंतर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. पॅरिसमध्ये नीरजची फायनल ८ ऑगस्टला आहे. मात्र, त्या फायनलपूर्वी भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठी घोषणा केली आहे.

पंतने केली मोठी घोषणा

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतने मोठी घोषणा केली आहे. त्याने सांगितले की जर नीरज चोप्राने फायनलमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले तर तो बक्षीस म्हणून चाहत्यांना 100089 रुपये देईल.

पंतने बुधवारी X वर लिहिले, "जर उद्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. ट्विटला सर्वात जास्त लाईक आणि कमेंट करणाऱ्या भाग्यवान विजेत्याला मी रु. 100089 देईन. आणि बाकीच्या टॉप 10 लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विमानाची तिकिटे मिळतील. चला माझ्या भावाला सपोर्ट करूया....."

ऋषभ पंतने नीरज चोप्राला जास्तीत जास्त पाठिंबा देण्याची मोहीम सुरू केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या पात्रतेत नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावर होता. त्याने 89.34 मीटर भाला फेकला. जी त्याच्या मोसमातील सर्वोत्तम होता.

आता अंतिम फेरीतही नीरजची लय कायम राहिली तर भालाफेकमध्ये तो ऑलिम्पिक विजेतेपदाचा रक्षण करू शकतो. आणि, जर असे घडले, तर ऋषभ पंतने ट्विट केल्याप्रमाणे, भाग्यवान विजेत्याला एक लाखाहून अधिक रुपये मिळतील याची खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

SCROLL FOR NEXT