manu bhaker sarbjot singh sakal
क्रीडा

Manu Bhaker Create History in Paris Olympic 2024 - शेवटचा नेम अन् विजयाचा जल्लोष! पाहा तो ऐतिहासिक क्षण Video

Manu Bhaker create History Viral Video from Paris Olympic 2024: १९००च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 - भारताची नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली. मनु भाकरने मंगळवारी सरबजोत सिंग याच्यासह मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

कांस्यपदकाच्या लढतीत चुरस...

कोरियन खेळाडूने पहिल्या शॉट्समध्ये २ गुण घेताना भारतीय जोडीवर दडपण वाढवले. पण, मनुने १०.७ व सरबजोतने १०.५ गुण घेत मॅच २-२ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर सलग चार सीरिजमध्ये प्रत्येकी २ गुण घेताना भारतीय जोडीने ८-२ अशी विजयी आघाडी घेतली. सहाव्या सीरिजमध्ये कोरियन जोडीने पुनरागमन करताना पिछाडी ४-८ अशी कमी केली, परंतु सातवी सीरिज भारतीय जोडीने जिंकली.

८व्या प्रयत्नात पुन्हा कोरियन खेळाडू २ गुण घेत मॅच ६-१० अस अटीतटीचा आणला. पण, भारतीय जोडी पदकावरील पकड मजबूत करण्याच्या निर्धारानेच खेळली आणि ९व्या शॉट्समध्ये २ गुण घेताना आघाडी १२-६ अशी भक्कम केली. १०व्या शॉट्समध्ये पुन्हा दोन गुण घेतले. कोरियन हार मानणाऱ्यांपैकी नव्हते आणि त्यांनी ११व्या व १२ व्या शॉट्समध्ये २ गुण घेतले. पण, भारताचा १४-१० असा विजय पक्का झाला. १३व्या सीरिजमध्ये २ गुण घेत भारताने १६-१० गुणासह कांस्यपदक निश्चित केले.

१९०० नंतर थेट २०२४

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली. १९००च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. प्रिचर्डनंतर एकाही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार ( कुस्ती) व पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन ) यांनी भारतासाठी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT