Paris Olympics Bajrang Punia Ravi Dahiya eliminated from qualification race wrestling trials news  
क्रीडा

Bajrang Punia and Ravi Dahiya News : बजरंग पुनियासह दोन स्टार कुस्तीपटूंचं पॅरिस ऑलम्पिकचं स्वप्न भंगलं! ट्रायल्समध्ये....

Paris Olympics qualification race :भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पूनिया याला मोठा धक्का बसला आहे. बजरंग पुनिया याला पॅरिस ऑलम्पिक क्वालिफायर्ससाठी आयोजित नॅशनल सलेक्शन ट्रायल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रोहित कणसे

Paris Olympics Bajrang Punia Ravi Dahiya eliminated from qualification race : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला मोठा धक्का बसला आहे. पूनिया याला पॅरिस ऑलम्पिक क्वालिफायर्ससाठी आयोजित नॅशनल सलेक्शन ट्रायल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलम्पिक (2020) मध्ये बजरंगने कास्य पदक मिळवलं होतं, मात्र त्याला रोहित कुमारने ६५ किलोग्रॅम फ्रीस्टाइल वजन गटाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत केले आहे. सेमिफायनलमध्ये रोहितने पुनियाला ९-१ च्या फरकाने पराभूत केलं. आता फायनलमध्ये रोहित आणि सुजीत यांच्याथ लढत होणार आहे.

तर दुसरीकडे टोकियो ऑलंम्पीकमध्ये रौप्य पदक विजेता रवि दहिया याला देखील परभवाचा सामना करावा लागला आहे. ५७ किलोग्रॅम फ्रीस्टाइल वजनी गटात उदित याने त्याला १०-८च्या फरकाने पराभूत केलं आहे. ट्रायल्स जिंकणाऱ्या खेळाडूंना पॅरिस ऑलम्पीक क्वालीफायर्समध्ये मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच आता रवि दहिया आणि बजरंग पूनिया यांना पॅरिस ऑलम्पिक मध्ये खेळता येणार नाहीये. ट्रायल्सचे आयोजन सोनीपत येथील स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SIA) अकॅडमीमध्ये पार पडले.

बजरंग पुनिया डब्लूएफआय (भारतीय कुस्ती महासंघ)चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये सहभागी होता. बजरंगने काही दिवसांपूर्वी यूनायटेड वर्ल्ड रेसलिंग(UWW) ला पत्र लिहून डब्लूएफआय विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसातच UWW ने डब्लूएफआय वर लादलेली बंदी हटवली होती.

बजरंग पुनिया याने २०१९ रोजी कझाकिस्तान येथे नूर सुल्तानमध्ये आयोजित वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये पोहचून पहिल्यांदा ऑलम्पिकसाठी क्वालिफाय केलं होतं. त्या चॅम्पियनशिमपमध्ये बजरंगने कास्य पदक जिंकलं होतं. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये हे त्याचं तिसरं पदक होतं. टोकिओ ऑलम्पिक २०२० मध्ये बजरंगकडून गोल्ड मेडलची अपेक्षा करण्यात येत होती, मात्र तेथे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT