Paris Olympics India In Medal Tally Esakal
क्रीडा

Paris Olympics: भारताची मोहिम 6 पदकांवर संपली; प्रयत्न करूनही Medals Table मध्ये झाली घसरण 

Medal Tally Of Paris Olympics: जवळपास तीन आठवड्यांच्या उत्साह आणि रोमहर्षक स्पर्धेनंतर पॅरिस ऑलिम्पिकची आज 11 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सांगता होणार आहे.

आशुतोष मसगौंडे

पॅरिस ऑलिंपिक 2024 ची आज सांगता होत आहे. जरी या ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. असे असले तरी 9 ऑगस्ट रोजी कुस्तीमध्ये भारताला यंदाचे पहिले पदक मिळाले ज्यामध्ये अमन सेहरावतने कांस्यपदक जिंकले, या ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक होते. यामुळे पदकतालिकेत भारताच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. पदकतालिकेत भारत 71 व्या स्थानी राहिला आहे.

ऑलिम्पिक 2024 मध्ये वेगवेगळ्या नेमबाजी स्पर्धांमध्ये 3 कांस्यपदके जिंकण्यात भारताला यश आले असताना, 8 ऑगस्ट रोजी भारतीय हॉकी संघानेही कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले, त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 5 वर पोहोचली होती. 5 ऑगस्ट रोजी भारताला कुस्तीमधील 57 किलो फ्री-स्टाईल स्पर्धेत अमन सेहरावतने आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. यानंतर भारताकडे एकून 6 कांस्य पदके झाली आहेत. 14 ऑगस्ट म्हणजेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात होईपर्यंत पकदतालिकेत भारत 71 व्या स्थानी होता.

या ऑलिम्पिकमध्ये चीन आणि अमेरिकेन खेळाडूंची जादू दिसली आहे. पदकतालिकेत चीनने अव्वल स्थान पटकावले असून त्यांंनी एकूण 90 पदके जिंकली आहेत. यात 39 सुवर्ण, 27 रजत आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे.

दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेने सर्वाधिक 122 पदके जिंकूनही ते दुसऱ्या स्थानी आहेत. कारण अमेरिकेपेक्षा चीनकडे एक सुवर्णपदक जास्त आहे.

यामध्ये एकूण 50 पदकांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे, तर जपान आणि फ्रान्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

श्रीजेश आणि मनू हे भारताचे ध्वजवाहक

जवळपास तीन आठवड्यांच्या उत्साह आणि रोमहर्षक स्पर्धेनंतर पॅरिस ऑलिम्पिकची आज 11 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सांगता होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकचा सांगता समारंभ भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होणार आहे.

या सांगता समारंभात दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीआर श्रीजेश आणि मनू भाकर हे भारतीय ध्वजवाहक असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT