Sachin Siwach Indian boxer  sakal
क्रीडा

Sachin Siwach : जागतिक पात्रता फेरीत सचिन सिवाच अपयशी

अमित पंघाल व जास्मिन या भारतीय बॉक्सर्सनी रविवारी भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी करताना पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक (थायलंड) - अमित पंघाल व जास्मिन या भारतीय बॉक्सर्सनी रविवारी भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी करताना पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला.

अमित याने पुरुष विभागातील ५१ किलो वजनी गटात, तर जास्मिन हिने महिला विभागातील ५७ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना ठोसा लगावत भारताचा बॉक्सिंग या खेळातील अनुक्रमे पाचवा व सहावा कोटा मिळवून दिला. थायलंडमधील बँकॉक येथे जागतिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित पंघाल याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या लिऊ चुआंग याच्यावर ५-० असा सहज विजय मिळवला. जास्मिन हिला ५७ किलो वजनी गटात खेळावे लागले.

परवीन हूडाला निलंबित केल्यामुळे जास्मिन हिची या वजनी गटासाठी निवड झाली. जास्मिन ही ६० किलो वजनी गटात सहभागी होत असे, पण निवड समितीचा निर्णय याप्रसंगी तिने सार्थ ठरवला. जास्मिन हिने मरीन कमारा हिच्यावर ५-० असा महत्त्वपूर्ण विजय संपादन केला.

तीन खेळाडूंचे यश

निखत झरीन (५० किलो वजनी गट), प्रीती (५४ किलो वजनी गट), लवलीना बोर्गोहेन (७५ किलो वजनी गट) या तीन महिला बॉक्सर्सनी भारताला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला होता. आता या स्पर्धेमधून भारताला तीन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला आहे.

अमित पंघाल व जास्मिन यांच्याआधी निशांत देव याने ७१ किलो वजनी गटात कोटा मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

प्ले ऑफमध्ये निराशा

भारताला रविवारी आणखी एक ऑलिम्पिक कोटा मिळू शकला असता, पण थोडक्यासाठी हुलकावणी मिळाली.

सचिन सिवाच याला ५७ किलो वजनी गटात निराशेला सामोरे जावे लागले. किर्गीस्तानच्या मुनारबेक सेतबेक उल याच्याकडून त्याला तिसऱ्या स्थानासाठीच्या प्ले ऑफ लढतीत हार पत्करावी लागली. सचिनचा ५-० असा पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : राज्यातील १५ हजार तलाठ्यांचा 'एल्गार'! कालबाह्य लॅपटॉप प्रशासनाकडे जमा, ऑनलाइन कामं ठप्प

Chandrapur : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, कुठे आणि कशी तेही सावकारानं सांगितलं; शेतकऱ्याच्या आरोपाने खळबळ

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत आली लोकप्रिय अभिनेत्री; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसली, प्रेक्षकांनी पाहताच ओळखली

Kolhapur : लोकसभा- विधानसभेपुरतेच अजित पवार हवे होते; आता महायुतीत गरज संपली – सतेज पाटीलांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT