Paris Olympics sakal
क्रीडा

Paris Olympics : पुरुष तिरंदाज संघाचीही;ऑलिंपिक पात्रता हुकली

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी असलेल्या अखेरच्या पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजी पुरुष संघ महिलांप्रमाणे ऑलिंपिक कोटा मिळवू शकला नाही, त्यामुळे आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्थान मिळण्याकरिता रँकिंगवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंतल्या (तुर्कस्थान) : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी असलेल्या अखेरच्या पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजी पुरुष संघ महिलांप्रमाणे ऑलिंपिक कोटा मिळवू शकला नाही, त्यामुळे आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्थान मिळण्याकरिता रँकिंगवर अवलंबून राहावे लागणार आहे.

भारतीय महिला संघाला काल युक्रेनविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर आज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला पुरुषांचा संघ मेक्सिकोविरुद्ध शूटऑफमध्ये पराभूत झाला. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला अव्वल मानांकन होते; परंतु आजच्या लढतीत त्यांची ४-५ (५७-५६, ५७-६३, ५५-५६, ५५-५८ (२६-२६*) अशी हार झाली.

पहिल्या दोन सेटमध्ये भारतीयांनी विजय मिळवत ४-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सेटमध्ये बरोबरी त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवून देणास पुरेशी ठरली असती; परंतु मोक्याच्या क्षणी गुण गमावले. मेक्सिकोने बरोबरी साधली आणि त्यानंतर शूटऑफमध्ये विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT