Pat Cummins creates history, sold for Rs 20.5 cr to SRH marathi news 
क्रीडा

Pat Cummins : 20.50 कोटी...! पॅट कमिन्सवर हैदराबादनं जीव ओवाळून टाकला; ठरला इतिहासातील महागडा पहिला खेळाडू

पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ठरला खेळाडू

Kiran Mahanavar

Pat Cummins Most Expensive in IPL History : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपचा विजेता कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. सुरूवातीला चेन्नई आणि मुंबईने खरेदी करण्यात रस दाखवला होता. पण त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चुरशीची लढत झाली.

स्टार अष्टपैलू पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असून अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आणि आता सर्वांना आश्चर्यचकित करत पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

पॅट कमिन्सची बोली 2 कोटी रुपयांपासून सुरू झाली, जेव्हा सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी पहिली बोली लावली आणि नंतर चेन्नई आणि मुंबईने रस दाखवला, पण ते लवकर बाहेर झाले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बोलीमध्ये सामील झाले. पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT