Pat Cummins says players not robots as Australian T20 team struggles sakal
क्रीडा

Ind vs Aus : 'आम्हीसुद्धा माणसे आहोत, यंत्र नाही...' वर्ल्ड कपनंतर लगेचच टी-20 मालिका खेळवण्यावर कर्णधार संतापला

Kiran Mahanavar

Pat Cummins Players Not Robots : आम्हीसुद्धा माणसे आहोत, यंत्रमानव नाही, असे टीकास्त्र ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सने सोडले. वर्ल्डकपनंतर लगेचच ऑस्ट्रेलिया संघ भारतात पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. त्याचा ताण सातत्याने खेळत असलेल्या खेळाडूंवर पडला. परिणामी या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

भारताविरुद्ध होत असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघातील जवळपास अर्धे खेळाडू आजच्या तिसऱ्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील ट्रॅव्हिस हेड हाच खेळाडू कायम रहाणार आहे. आजच्या सामन्यानंतर मालिकेतील पुढचे दोन सामने रायपूर (१ डिसेंबर) आणि बंगळूर (३ डिसेंबर) होणार आहेत.

विश्वकरंडक स्पर्धा १९ तारखेला संपली त्यानंतर चार दिवसांतच ही मालिका सुरु झाली. या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघातील सात खेळाडू या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार होते, परंतु डेव्हिड वॉर्नरसह काही खेळाडूंनी अगोदरच माघार घेतली आता बघता बघता त्या विजेत्या संघातील केवळ एकच खेळाडू शिल्लक राहिला.

आम्ही सुद्धा माणसे आहोत, विश्वकरंडक स्पर्धेसाठी आम्ही स्वतःला झोकून दिले आणि लगेचच पुढची मालिका खेळायची अशा वेळी १०० टक्के योगदान दिले जात नाही, अशा वेळी खेळाडूंवरचा ताण कमी कमी करण्यासाठी आम्ही पुढच्या दोन सामन्यांसाठी नव्या खेळाडूंना संधी देत आहोत. असे कमिंसने सांगितले. स्वतः कमिंस या मालिकेक खेळणार नव्हताच त्यामुळे विश्वकरंडक जिंकल्यानंतर तो दोन दिवसांत मायदेशी परतला.

१९ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया संघ भारतात

विश्वकरंडक स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरु झाली असली तरी त्या अगोदर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ १९ सप्टेंबर रोजी भारतात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT