Pawan Sehrawat Injured sakal
क्रीडा

Pro Kabaddi : मोठी दुर्घटना! पहिल्याच सामन्यात सर्वात महागडा खेळाडू स्ट्रेचरवरून बाहेर

पवन सेहरावतला यंदाच्या हंगामात सगळ्यात जास्त बोली लागली होती त्याची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे

Kiran Mahanavar

Pawan Sehrawat Injured : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात तमिळ थलैवासची सुरुवात चांगली झाली नाही. थलायवास गुजरात जायंट्सविरुद्ध मोसमातील पहिला सामना खेळत असून पूर्वार्धातच त्यांना मोठा धक्का बसला आहे. लीगमधील सर्वात मोठा स्टार पवन सेहरावत दुखापतग्रस्त झाला आहे. बचाव करताना पवन जखमी झाला असून त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.

थलायवाससाठी मॅटवर फक्त दोनच खेळाडू होते. यादरम्यान पवनने सहकारी बचावपटूला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा पाय वळल्यामुळे तो जखमी झाला. पवनच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो वेदनेने ओरडत होता. फिजिओने तिथे येऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. वेदनेने ओरडणाऱ्या पवनला पायही हलवता येत नव्हता. यानंतर त्याला मैदानाबाहेर काढावे लागले. तो चालण्याच्या स्थितीतही नव्हता आणि त्यामुळेच त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.

पवन हा लीग इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. थलायवासने त्याला यंदाच्या मोसमाच्या लिलावात 2.26 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पहिल्याच सामन्यात त्याची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. पवनला संघाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात पवनने केवळ दोनच चढाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT