Zaka Ashraf PCB esakal
क्रीडा

Zaka Ashraf PCB : भारत दुश्मन मुल्क... पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनचीच जीभ घसरली

अनिरुद्ध संकपाळ

Zaka Ashraf PCB : पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 7 वर्षांनी भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी दाखल झाला. यावेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांचे खुल्या दिलाने जोरदार स्वागत केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला.

मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी भारताबद्दल चांगले उद्गार काढले नाही. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत झाका हे भारताला दुश्मन मुल्क म्हणून संबोधताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओत झाका अश्रफ म्हणतात, 'आम्ही आमच्या खेळाडूंना प्रेमाने हा नवा करार दिला आहे. पाकिस्तानच्या इतहिसात एवढी मोठी रक्कम पाकिस्तानच्या खेळाडूंना कधी मिळाली नव्हती. दुश्मन देशात खेळायला जाताना खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचा माझा प्रयत्न होता.'

झाका यांनी हे वादग्रस्त उद्गार हे पाकिस्तानचा संघ हैदराबाद येथे दाखल झाल्यानंतर आणि त्यांचे भारतात जोरदार स्वागत झाल्यानंतर काढले आहेत. यामुळे झाका यांच्या यावक्तव्यावर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया येत आहेत. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी झाका यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट फॅन तहसीन कासीम यांनी ट्विट केले की, 'पीसीबी चेअरमन यांना भारताला दुश्मन मुल्क संबोधताना लाज वाटली पाहिजे. त्यांनी आपलं जोरदार स्वागत केलं आहे. झाका हेच संघाचे खरे दुश्मन आहेत. प्रिय भारतीयांनो या व्यक्तीला फार गांभिऱ्याने घेऊ नका. हा राजकारण्यांची हांजी हांजी करणारा व्यक्ती आहे त्यामुळेच त्याला चेअरमन केलं आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT