PCB chief Ramiz Raja uses bulletproof vehicle owing to security threat  esakal
क्रीडा

Ramiz Raja: रमीझ राजाला जिवे मारण्याच्या धमक्या; जीव वाचवण्यासाठी....

रमीझ राजा यांनी आता आणखी एक खुलासा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

माजी फलंदाज रमीझ राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यापासून ते नवनवीन खुलासे करत आहेत. रमीझ राजा यांनी आता आणखी एक खुलासा केला आहे. पीसीबीमध्ये असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. असा नवा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. (PCB chief Ramiz Raja uses bulletproof vehicle owing to security threat )

पीसीबीमध्ये असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आणि तेव्हापासून ते बुलेट प्रूफ कार वापरत होते. असं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे.

जीव वाचवण्यासाठी करोडोंच्या कार खरेदी केल्या

रमीझ राजा पीसीबीचे अध्यक्ष असताना त्यांनी 1.65 कोटींची कार खरेदी केली होती. या प्रकरणी त्याला विचारले असता, सम टीव्हीशी बोलताना राजा म्हणाले,“ती गाडी पीसीबीकडे आहे. मी ते विकत घेतले नाही. माझ्यानंतर जे आले आहेत ते देखील वापरू शकतात. मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याशिवाय तुम्ही बुलेट प्रूफ कार खरेदी करू शकत नाही. म्हणूनच मी ही कार घेतली आहे."

तसेच, “मी याबद्दल अधिक माहिती मी देऊ शकत नाही. पण हा प्रकार मार्च-2022 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान घडला. डीआयजी साहब माझ्या घरी आले होते आणि त्याच्या तपशीलावरून अहवाल तयार केला होता.

पाकिस्तान सरकारने राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवले आणि त्यांच्या जागी नजम सेठी यांची नियुक्ती केली. सेठी यांनी पदाची सूत्रे हाती घेताना अनेक बदल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT