pcb invites jay shah to pakistan to watch opening match of asia cup Sakal
क्रीडा

Asia Cup : जय शहा यांना पाक मंडळाचे निमंत्रण

आशिया क्रिकेटः सलामीच्या लढतीस उपस्थित राहाण्याचे पत्र

सकाळ वृत्तसेवा

कराची : काही दिवसांवर आलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीचा सामना पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि त्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जय शहा यांना पाकमध्ये होणाऱ्या या उद्घघाटनाच्या सामन्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाक मंडळाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी दिले आहे.

जय शहा हे आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्षही आहेत. त्या पदामुळे त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे; परंतु भारत-पाकमधील संबंध आणि प्रामुख्याने जय शहा यांची सुरक्षा पाहता ते निमंत्रण स्वीकारून या उद्घघाटनाच्या सामन्यात उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

स्पर्धेतील सलामीचा सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. शहा यांच्यासह या स्पर्धेत खेळणाऱ्या इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

या स्पर्धेचे मूळ यजमान पाकिस्तान होते; परंतु कोणत्याही परिस्थितीत भारताचा संघ पाकमध्ये खेळणार नाही, ही भूमिका बीसीसीआयने ठामपणे मांडली. त्यामुळे स्पर्धा पूर्ण करायची असेल तर त्यांना सहयजमान होऊन इतर सामने श्रीलंकेत खेळवणे भाग पडले. त्यामुळे आता पाकमध्ये केवळ चार आणि श्रीलंकेत अंतिम सामन्यासह ९ सामने होणार आहेत. पाक सहयजमान असले तरी त्यांचा एकच सामना मायदेशात होणार आहे.

जय शहा यांनी पाक मंडळाचे निमंत्रण स्वीकारले असून ते सलामीच्या सामन्यात उपस्थित राहाणार असल्याची आवई पाकिस्तान मीडियाने उठवली होती; परंतु आपण निमंत्रण स्वीकारले नसल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT