Champions Trophy 2025 marathi news 
क्रीडा

अखेर शिक्कामोर्तब! ICC चा मोठा निर्णय वादग्रस्त ठिकाणी खेळली जाणार 2025 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी

Kiran Mahanavar

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदावरून काही महिन्यांआधी खुप राडा पाहिला मिळाला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला होता की, आशिया कप 2023 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले. पण आता अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाचे अधिकार पाकिस्तानला मिळाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने शुक्रवारी (15 डिसेंबर) दुबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबत करार केला आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या होस्टिंग अधिकारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये किंवा अन्य कुठल्यातरी देशात होऊ शकतो या अटकळांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

या करारावेळी आयसीसीचे जनरल कौन्सेल जोनाथन हॉल यांच्यासह पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ उपस्थित होते. 1996 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही मोठ्या ICC स्पर्धेचे आयोजन केले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटसाठी या स्पर्धेचे आयोजन करणे ही एक महत्त्वाची संधी आहे.

पाकिस्तानला यजमानपद मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सुरक्षा व्यवस्थेवर असतील. पीसीबीने सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. आणि म्हटले आहे की, "पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार्‍या संघांना निर्दोष सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारला आधीच माहिती दिली आहे.

तथापि भारतीय क्रिकेट नियामक मंडळने अद्याप या ICC स्पर्धेत भारताच्या सहभागाबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. अशा स्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघ शेजारी देशाचा दौरा करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर दोन आशियाई देशांमधील (भारत आणि पाकिस्तान) द्विपक्षीय मालिका बंद झाली आहे. 2008 नंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT