Peter Siddle 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलची निवृत्ती

वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सीडल याने आज (रविवार) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याची 11 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली आहे.

सिडलने फॉक्स क्रिकेटशी बोलताना म्हटले आहे, की माझ्यासाठी हा निर्णय कठीण आहे, पण हीच वेळ योग्य आहे. ऍशेस राखणे हाच आमचा मुख्य उद्देश होता. अनेक प्रमुख मालिकांमध्ये मी संघासोबत राहिलो आहे. कर्णधार टीम पेनशी मी निवृत्तीबाबत बोललो होतो. मायदेशात अखेरची कसोटी खेळण्याची संधी मला मिळाली. संघाने मला संधी दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे.

सीडलने 2008 मध्ये भारताविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्याने कसोटी कारकिर्दीत आठवेळा पाच बळी मिळविण्याची कामगिरी केलेली आहे. 2013-14 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने 23 बळी मिळविले होते. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-0 अशी जिंकली होती. 2019 मध्ये झालेल्य ऍशेस मालिकेत त्याने अखेरची कसोटी खेळली होती. त्याने कारकिर्दीत 67 कसोटीत 221 बळी मिळविले आहेत. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाकडून 20 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

SCROLL FOR NEXT