PKL 2021 Bengaluru Bulls vs U Mumba  Twitter
क्रीडा

U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

यू मुम्बाने सामना 46-30 असा खिशात घातला.

सुशांत जाधव

PKL 2021 Bengaluru Bulls vs U Mumba : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आठव्या हंगामातील सलामीच्या लढतीत यू मुम्बाने (U Mumba) बंगळुरु बुल्सला (Bengaluru Bulls) पराभूत करत विजयी सलामी दिली. पहिल्या हाफमध्येच यू मुम्बाने 24-17 अशी आघाडी घेत बंगळुरु बुल्सला बॅकफूटवर ढकलले होते. पहिल्या हाफमध्ये घेतलेल्या 7 पॉइंट्सची आघाडीत आणखी 9 पॉइंट्सची भर घालून यू मुम्बाने सामना 46-30 असा खिशात घातला.

यू मुम्बाच्या विजयात अभिषेक सिंगने (AbhishekSingh) मोलाचा वाटा उचलला. चढाईमध्ये (Raid) 15 आणि बोनस 4 (Bonus) स्वरुपात 19 गुण मिळवले. दुसऱ्या बाजूला व्ही अजिथकुमारने (V.AjithKumar) त्याला उत्तम साथ दिली. त्याने चढाईमध्ये (Raid) घेतलेल्या 5 गुणांसह बोनस स्वरुपात एक गुण असे संघाला एकूण 6 गुण मिळवून दिले.

बंगळुरु बुल्सकडून पवन कुमार (PawanKumar) 7+5 (Raid+ Bonus) असे 12 गुण मिळवले. चंद्रन रंजितनेही (ChandranRanjit) 12 गुण मिळवले. बंगळुरु बुल्सला Tackle मध्ये केवळ तीन गुणांची कमाई करता आली. यात मयूर कदमने 2 तर मोरे जीबी यांने एका गुणाची भर घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT