Baba Aparajith  esakal
क्रीडा

Baba Aparajith : धोनीकडून काही शिकला नाही! बाद झाल्यावर आधी अंपायरशी नंतर खेळाडूंशी भिडला

अनिरुद्ध संकपाळ

Baba Aparajith : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला स्टार खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका क्लब क्रिकेटमधील सामन्यात या स्टार खेळाडूने अंपायर्स आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी चांगलीच हुज्जत घातली. आता याची चर्चा संपूर्ण क्रिकेट वर्तुळात होत आहे. या खेळाडूला कसे बसे पॅव्हेलियनकडे पाठवण्यात येत होते. मात्र तो पुन्हा पलटला आणि मैदानावर राडा केला. या खेळाडूचं नाव आहे बाबा अपराजित!

जॉली रोवर्स सीसी आणि यंग स्टार्स क्रिकेट क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. यावेळी अंपायर्सनी बाबा अपराजितला वादग्रस्तरित्या पायचीत बाद ठरवले. यानंतर अपराजित मैदानाबाहेर जाण्याआधी अंपायर्स आणि विरोधी संघातील खेळाडूंशी भिडला. यानंतर अंपायर्सनी आपला निर्णय बदलून त्याला झेलबाद ठरवले.

बाबा अपराजित 34 धावांवर खेळत होता त्यावेळी ही घटना घडली. जॉली रोवर्स सीसीचा कर्णधार हरी निशांतचा एक स्पिन होणारा चेंडू अपराजितच्या पॅडला लागून फॉर्वर्ड शॉर्टलेगला उभ्या असलेल्या जीएस राजूकडे गेला. त्याने हा कॅच पकडला. सर्वांनी अपिल केली. त्यानंतर अंपायर्सनी अपराजितला बाद देले.

मात्र अंपायर्स आपल्या निर्णयावर ठाम होते. यानंतर विरोधी संघातील खेळाडू आणि अपराजित यांच्यात चर्चा सुरू झाली. पॅव्हेलियनकडे परतताना अपराजित अंपायर्सची हुज्जत घालत होता. तो जाता जात परत मैदानात आला अन् पुन्हा वाद घालू लागला. यंगस्टार्सची अवस्था 2 बाद 32 धावा अशी झाली असताना बाबा अपराजित खेळण्यासाठी आला होता.

त्याने साई सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली होती. बाबा अपराजितने मैदानावर राडा केला असला तरी त्याच्या संघाला 4 विकेट्सनी विजय मिळवण्यात यश मिळाले. साई सुदर्शनने 92 चेंडूत 67 धावांची खेळी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT