PM Narendra Modi speaks to India's Thomas Cup 2022 winners esakal
क्रीडा

थॉमस कप विजेत्या भारतीय संघाशी PM मोदींचा संवाद, बक्षीसांचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय संघाशी संवाद साधला

धनश्री ओतारी

भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या भारतीय संघाशी संवाद साधला आहे.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.

संघाच्या या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी संघाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये झालेल्या संवादा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

अशाचप्रकारे गतवर्षी पंतप्रधान मोदी यांनी टोकियो विजेत्यांशी संवाद साधला होता. आणि त्यांना प्रोत्साहित केले होते.

मोदींच्या संवादानंतर बॅडमिंटनपटू प्रणॉय एचएसने मोदींचे आभार मानले आहेत. "हे खूप खास होते, आम्हाला असे घडण्याची अपेक्षा नव्हती. पीएम मोदी आपल्यापैकी प्रत्येकाला नावाने ओळखत होते. मला वाटते की ही गोष्ट विलक्षण आहे. गेल्या काही वर्षांत खेळांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. अशी भावना प्रणॉय एचएसने मोदींसोबतच्या संवादानंतर व्यक्त केली.

खेळ मंत्रालयाकडून 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर

ऐतिहासिक विजयानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून 1 कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. ठाकूर यांनी ट्विट केले की, 'भारतीय संघाने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियचा 3-0 असा पारभव केला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप पटकावला. भारतीय क्रीडाविभागाला या दैदिप्यमान विजयानंतर संघासाठी 1 कोटी रूपये बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. आम्ही यासाठी नियमात शिथीलता देत आहोत.'

बॅडमिंटन असोशिअननेदेखील बक्षीसांचा केला वर्षाव

विजेत्या संघाला बॅडमिंटन असोशिअने खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. बीएआयचे अध्यक्ष हेमंता बिसवा सरमा यांनी आपल्या ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. असोशिअनने संघाला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे. तर स्टाफला 20 लाख रुपये देत सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT