PM Narendra Modi Visits Indian Dressing Room To Motivate Players After Loss To Australia  
क्रीडा

World Cup 2023 : 'आम्ही खचून गेलो होतो पण...' वर्ल्ड कप हरल्यावर मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये, जडेजाची भावुक पोस्ट

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवामुळे लाखो चाहत्यांची मनं दुखावली गेली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंसोबतच चाहत्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले होते. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने पंतप्रधान मोदींसाठी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

खरं तर, जडेजाने X वर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो पंतप्रधान मोदींसोबत दिसत आहे. जडेजासोबत टीम इंडियाचे इतर खेळाडूही दिसत आहेत. सामन्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय संघाची भेट घेतली.

जडेजाने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले, संपूर्ण टूर्नामेंट आमच्यासाठी चांगली होती. पण शेवटचा सामना चांगला झाला नाही. तो एक हृदयद्रावक क्षण होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आले. आणि त्याने आम्हाला प्रेरित केले.

वर्ल्ड कप 2023 चा फायनल मॅच पाहण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत इतरही अनेक सेलिब्रिटी आले होते. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही स्टेडियममध्ये दिसले. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि रोहित शर्माची पत्नी रितिकाही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.

अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत लक्ष्य गाठले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब देण्यात आला. ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT