FIFA World Cup 2022 Poland Defeat Saudi Arabia esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : सैदीचा तोरा पोलंडने उतरवला; अर्जेंटिनाला मात देणारे दुसऱ्याच सामन्यात झाले गारद

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Poland Defeat Saudi Arabia : सौदी अरेबियाने फिफा वर्ल्डकप 2022 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाचा 2 - 1 असा पराभव केला होता. मात्र स्टार मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या सौदी अरेबियाला पोलंडने दुसऱ्याच सामन्यात 2 - 0 असा पराधवाचा धक्का देत त्यांना जमिनीवर आणले. सौदी अरेबियाने आजच्या सामन्यात पोलंडवर अनेक चढाया केल्या. मात्र खेळात सफाईदारपणा न राखता आल्याने त्यांना या चढायांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसरीकडे पोलंडने तुलनेने कमी चढाया केल्या मात्र गोल करताना कोणतीही चूक न केल्याने पोलंडला विजय मिळवता आला. पोलंडकडून कर्णधार रॉबर्ट लेवाँडोव्हस्की (82 मिनिट) आणि पिओत्र झैलेन्स्की (39 मिनिट) यांनी गोल केले.

अर्जेंटिनाचा पराभव केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या सौदी अरेबियाने पहिल्यापासूनच पोलंडविरूद्ध आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलंडच्या गोलपोस्टवर सातत्याने चढाया केल्या. मात्र खेळात सफाईदारपणा नसल्याचा त्यांना फटका बसला. सौदीने गोल करण्याच्या अनेक संधी गमवाल्या.

या उलट पोलंडने सामन्यात फक्त 3 शॉट्स ऑन टार्गेट मारले. त्यातील दोनवर गोल केले. पोलंडकडून पहिला गोल झैलेन्स्कीने 39 व्या मिनिटाला केला. पोलंडचा कर्णधार लेवाँडोव्हस्कीने दिलेल्या पासवर त्याने गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. त्यानंतर सौदी अरेबियाला या गोलची परतफेड करून सामना 1 - 1 असा बरोबरीत आणण्याची नामी संधी होती.

सौदीला हाफ टाईम संपण्यापूर्वीच एक मिनिट आधी 44 व्या मिनिटाला पेनाल्टी मिळाली होती. बैलेकने अल शहिरीला अवैधरित्या रोखल्यामुळे व्हीएआरवर पंचांनी सौदीला पेनाल्टी बहाल केली होती. मात्र सलीमचा फटका गोलकिपर शेडेस्त्नीने सेव्ह केला. पोलंडच्या गोलकिपर्सनी 1966 पासून वर्ल्डकपमध्ये पाचपैकी तीन पेनाल्टी सेव्ह केल्या आहेत.

यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सौदीने गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांनी संपूर्ण सामन्यात 15 वेळा पोलंडच्या गोलपोस्टवर चढाई केली. त्यातील पाच शॉट्स देखील ऑन टार्गेट राहिले. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. दरम्यान, पोलंडचा कर्णधार अनुभवी फुटबॉलपटू रॉबर्ट लेवाँडोव्हस्कीने 82 व्या मिनिटाला दुसरा गोल करून सौदी अरेबियाची सामन्यात पुनरागमन करण्याची उरली सुरली आशा देखील धुळीस मिळवली. सैदीने बॉल पजेशन, पासेस याबाबतीत पोलंडपेक्षा सरस खेळ केला. मात्र सौदी आक्रमक चाली चांगल्या फिनिश करू शकली नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT