Cricket Viral Video esakal
क्रीडा

Cricket Viral Video: वर्दीतला बॉलर! मुंबई इंडियन्सने देखील घेतली दांडी गुल करणाऱ्या पोलिसाची दखल

अनिरुद्ध संकपाळ

Cricket Viral Video : भारतात क्रिकेट न खेळलेला एकही माणूस सापडणार नाही. लहान मुलगा चालू लागला की त्याला पहिलं खेळणं हे क्रिकेटची बॅट आणि बॉलच असतं. त्यामुळे गल्लीत, टेरेसवर घराच्या अंगणात अन् घरातही क्रिकेट खेळलं जातं. यातूनच पुढे भारताचे दिग्गज क्रिकेटपटू तयार होतात. अशा या क्रिकेटमय भारतात सोशल मीडियावर क्रिकेट विषयक व्हिडिओ व्हायरल होणं ही काही नवी गोष्ट नाही.

मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द पोलीस कर्मचारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना दिसतोय. विशेष म्हणजे हा पोलीस कर्मचारी आपल्या वर्दीवरच नेटमध्ये वेगवान गोलंदाजी करत होता.

हा व्हिडिओ शेअर करून मुंबई इंडियन्सने त्याला एक भन्नाट कॅप्शन देखील दिले. पोलिसांची हेल्पलाईन 100 क्रमांकावर कॉल करत मुंबई इंडियन्स म्हणते, 'हॅलो 100 आम्ही अत्यंत वेगनान गोलंदाजीची तक्रार नोंदवत आहोत.'

या व्हिडिओतील पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कमरेची बंदूक काढून ठेवलेली आहे. त्यानंतर तो आपल्या वर्दीवरच नेटमधील एका फलंदाजाला गोलंदाजी करतोय त्याने फक्त तीनच चेंडू टाकले अन् त्या तीनही चेंडूवर नेटमधील फलंदाजाची दांडी गुल केली. त्याची बॉलिंग अॅक्शन पाहून तो नक्कीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेला असल्याचेचं जाणवतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

Mangalwedha Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना, त्रासाला कंटाळला अन् कृत्य..

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: भायंदर-नायगाव दरम्यान विद्युत यंत्रणेत बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

SCROLL FOR NEXT