Pooja Gehlot Won Bronze Medal In Wrestling Women 50 kg Freestyle in Commonwealth Games 2022
Pooja Gehlot Won Bronze Medal In Wrestling Women 50 kg Freestyle in Commonwealth Games 2022 esakal
क्रीडा

CWG 2022 : पिछाडी भरून काढत पूजा गेहलोतने जिंकले कांस्य पदक

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा 12 - 2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे. भारताने कुस्तीत आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 10 पदके पटकवाली आहेत.

भारताच्या पूजा गेहलोतची सामन्याच्या सुरूवात खराब झाली होती. स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेने पहिल्याच फेरीत 2 - 0 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर गेहलोतने ख्रिस्टलेविरूद्ध गटलेज डाव खेळत जोरदार मुसंडी मारली. तिने स्कॉटिश खेळाडूच्या पायावर पकड मजबूत करत तिला गोल गोल फिरवले. पूजाने ख्रिस्टलेला पाचवेळा गोल फरवल्यामुळे तिच्या खात्यात एकदम 10 गुण जमा झाले.

त्यानंतर पहिल्या फेरीत 10 - 2 अशी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीत पूजा गेहलोचने लगेचच दोन गुण मिळवत सामना 12 - 2 असा जिंकत भारताला कुस्तीत अजून एक कांस्य पदक मिळवून दिले. सध्या भारताची पदकसंख्या 31 झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT