क्रीडा

पोर्तुगालने वर्ल्डकपसाठी चार फुटबाॅलपटूंना वगळले

वृत्तसंस्था

लिसबन : युरो विजेतेपद मिळविलेल्या संघातील चौघांना वगळून पोर्तुगालने येत्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो त्यांचा एकांडा शिलेदार ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच गटात त्यांना स्पेनचे तगडे आव्हान असणार आहे. 

दोन वर्षांपूर्वीच्या युरो करंडक विजेत्या संघात समावेश असलेल्या काही खेळाडूंना संघातून वगळणे कठीण आहे; परंतु त्याशिवाय पर्याय नव्हता, असे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंतोस यांनी सांगितले. वगळलेल्या या चार प्रमुख खेळाडूंमध्ये लाझिओ संघाचा नानी, बार्सिलोनातून खेळणारा आंद्रे गोमेस, बायर्न म्युनिकचा रेनाटो सॅंचेझ आणि युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध जादा डावात गोल करणारा स्ट्रायकर एडगर यांचा समावेश आहे.

त्या अंतिम सामन्यात रोनाल्डो जखमी झाल्यामुळे काही वेळानंतर खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी पोर्तुगालची मदार सांभाळली होती. 

युरो स्पर्धेत विजेतेपदाच्या प्रवासात असलेल्या काही खेळाडूंना वगळणे हे दुःखद आहे. पोर्तुगालचा फुटबॉल इतिहास लिहिताना त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे; पण पुढील आव्हानांसाठी सर्वोत्तम संघ तयार करण्यासाठी मला काही इतर पर्याय पसंत करावे लागले, असे सॅंतोस यांनी सांगितले. 

मॅंचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू असलेला नानी हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस फिगो यांच्यानंतर पोर्तुगालचा सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. गतवर्षीच्या कॉन्फडरेशन करंडक स्पर्धेनंतर तो पोर्तुगालकडून खेळलेला नाही.

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या 23 खेळाडूंच्या संघात इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळलेल्या चार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये विजेत्या मॅंचेस्टर सिटीच्या बर्नांडो सिल्वाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story:'शेतकरी कुटुंबातील शिवानीची भारतीय हवाई दलात निवड'; महाराष्ट्रात सहावी रँक, कठोर परिश्रमातून यशाला गवसणी..

Pune Train: रेल्वे धावणार १६० किमी वेगाने; पुण्यात मिशन रफ्तारला सुरुवात, प्रवाशांचा वेळ वाचणार

Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी बनली डॉक्टर; उबाळे परिवारात पहिल्यांदाच घेतली उच्चशिक्षणाची भरारी

Latest Marathi News Live Update: 'प्रोजेक्ट महादेवा' चा वानखेडेवर शुभारंभ, फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांची उपस्थिती

Crime News: पती, दोन मुलं अन् अफेयर... हॉटेलमध्ये SEX नंतर भांडण; महिलेने थेट गुप्तांगच कापला... नंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT