Turkey vs Portugal Sakal
क्रीडा

Euro 2024 : युरो करंडकात पोर्तुगाल नवव्यांदा बाद फेरीत; तुर्कस्तानवर ३-० असा सफाईदार विजय

Turkey vs Portugal : अगोदरच्या लढतीत चेक प्रजासत्ताकावर निसटती मात केलेल्या पोर्तुगालने प्रारंभापासूनच वर्चस्व राखत ‘फ’ गटातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

सकाळ वृत्तसेवा

डॉर्टमंड : माजी विजेत्या पोर्तुगालने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘फ’ गटातून बाद फेरी निश्चित केली. त्यांनी तुर्कस्तानवर ३-० फरकाने सफाईदार विजय मिळविला. प्रतिस्पर्ध्यांच्या विस्कळित खेळाचा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा झाला. पोर्तुगालचा संघ नवव्यांदा बाद फेरीत पोहोचला.

अगोदरच्या लढतीत चेक प्रजासत्ताकावर निसटती मात केलेल्या पोर्तुगालने प्रारंभापासूनच वर्चस्व राखत ‘फ’ गटातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे एकूण सहा गुण झाले आहेत. पहिल्या लढतीत जॉर्जियाला नमविलेल्या तुर्कस्तानचे आता तीन गुण कायम असून अखेरचा साखळी सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. चेक प्रजासत्ताक व जॉर्जियाचा प्रत्येकी एक गुण आहे. अखेरच्या फेरीत पोर्तुगाल जॉर्जियाविरुद्ध खेळेल, तर चेक प्रजासत्ताकविरुद्ध तुर्कस्तानची लढत होईल.

सामन्याचा मानकरी ठरलेल्या बर्नार्डो सिल्वा याने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर पोर्तुगालला २१ व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर २८ व्या मिनिटास गोलरक्षक अल्ताय बायिन्दिर व बचावपटू समेत अकायदिन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका तुर्कस्तानला बसला. अकायदिन याच्या स्वयंगोलमुळे पोर्तुगालच्या खाती आणखी एक गोल जमा झाला.

५६ व्या मिनिटास ३९ वर्षीय रोनाल्डोच्या निःस्वार्थी साह्यावर ब्रुनो फर्नांडिसने पोर्तुगालला बाद फेरीत नेणारा गोल केला. रोनाल्डोने आता युरो करंडक इतिहासात आठ असिस्टची नोंद केली आहे. त्यांच्या बचावफळीत पुन्हा एकदा ४१ वर्षे व ११७ दिवसांचे पेप उल्लेखनीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT