PR Sreejesh | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

PR Sreejesh: निवृत्तीनंतरही श्रीजेशची हॉकीशी ताटातूट नाही! आता सांभाळणार 'ही' मोठी जबाबदारी

Hockey India: हॉकी इंडिया दोन ऑलिम्पिक पदक विजेता गोलकिपर पीआर श्रीजेशवर निवृत्तीनंतर आता मोठी जबाबदारी सोपवणार आहे.

Pranali Kodre

PR Sreejesh Retirement: भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. तब्बल ५२ वर्षांनी भारताच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग पदक जिंकण्याचा कारनामा केला.

गुरुवारी (८ ऑगस्ट) झालेल्या कांस्य पदकाच्या सामन्यात हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने स्पेनला २-१ अशा फरकाने पराभूत करत पदक नावावर केले. या विजयासह भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशही आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त झाला.

श्रीजेशने यापूर्वीच सांगितले होते की पॅरिस ऑलिम्पिक त्याची अखेरची स्पर्धा असणार आहे. त्यानेही त्याच्या अखेरच्या स्पर्धेत दमदार बचाव करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

श्रीजेश गेली १८ वर्षे भारतीय संघात असून त्याने अनेकदा भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला मोठा अनुभव देखील आहे.

आता त्याच अनुभवाचा फायदा युवा खेळाडूंना होणार आहे. कारण आता लवकरच हॉकी इंडिया त्याला भारताच्या ज्युनियर हॉकी टीमचा प्रशिक्षक करणार आहे. पीआर श्रीजेश भारताचा सर्वात यशस्वी गोलकिपर म्हणून ओळखला जातो.

त्याच्याबद्दल पीटीआयशी बोलताचान हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की म्हणाले, 'हो, आम्ही येत्या काही दिवसात श्रीजेशला मुलांच्या ज्युनियर संघाचा (२१ वर्षांखालील) प्रशिक्षक करणार आहोत. आम्ही याबाबत त्याच्याशी चर्चा केली आहे आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना घडवण्यासाठी त्याच्यापेक्षा उत्तम दुसरा पर्याय नाही.'

'त्याच्याकडे विलक्षण क्षमता आहे, जी त्याने ब्रिटनविरुद्ध खेळताना दाखवली. फक्त तेवढंच नाही, तो नव्या पिढीच्या गोलकिपरलाही मार्गदर्शन करेल.'

याशिवाय टिर्की यांनी अशीही इच्छा व्यक्त केली की श्रीजेशने कृष्णन बहादूर पाठक आणि सुरज करकेरा यांना मार्गदर्शन करावे. ते आता भारतीय संघात श्रीजेशची जागा घेतील.

भारतीय संघानेही पॅरिसमधील कांस्य पदक पीआर श्रीजेशला समर्पित केले आहे. पीआर श्रीजेशने दोन ऑलिम्पिक पदक विजयासह निवृत्ती घेतली आहे. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT