Chess World Cup 2023 Praggnanandhaa 
क्रीडा

Chess World Cup 2023 : तीन दिवस अन्‌ नऊ गेमनंतर प्रग्नानंद उपांत्य फेरीत! अर्जुनचा 5-4 असा केला पराभव

सकाळ ऑनलाईन टीम

Chess World Cup 2023 Praggnanandhaa : आर. प्रग्नानंद व अर्जुन इरिगेसी या भारताच्या दोन युवा खेळाडूंमध्ये विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेर तीन दिवस व ९ गेमनंतर या लढतीतील विजेता मिळाला. प्रग्नानंदने गुरुवारी ब्लिटझ्‌ गेममध्ये अर्जुनला ५-४ असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता अंतिम चार फेरीच्या लढतीत त्याच्यासमोर अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआना याचे आव्हान असणार आहे. नॉर्वेचा मॅग्सन कार्लसन व अझरबैजानचा निजात एबासोव यांच्यामध्ये अन्य उपांत्य लढत रंगेल.

प्रग्नानंद - अर्जुन यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीला मंगळवारी सुरुवात झाली. दोघांमध्ये सुरुवातीला क्लासिकल गेमचा थरार रंगला. या गेमचा पहिला टप्पा अर्जुनने जिंकला. बुधवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात प्रग्नानंदने झोकात पुनरागमन केले आणि १-१ अशी बरोबरी साधली.

दोघांमधील बरोबरीमुळे बुधवारी पुन्हा बुद्धिबळाच्या पटावर झुंज पाहायला मिळाली. या दिवसातील पहिले दोन्ही गेम बरोबरीत राहिले. हे दोन्ही गेम प्रत्येकी २५ मिनिटांचे होते. त्यानंतर दोन खेळाडूंमध्ये प्रत्येकी दहा मिनिटांचे दोन गेम खेळवण्यात आले. यातील पहिला गेम प्रग्नानंदने, तर दुसरा गेम अर्जुनने जिंकला. बरोबरीचा तिढा सुटेना. आता प्रत्येकी पाच मिनिटांच्या दोन गेमना सुरुवात झाली. प्रग्नानंदने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली. मात्र अर्जुनने दबावाखाली खेळ उंचावला आणि पुन्हा बरोबरी साधली.

अखेर ब्लिटझ्‌ गेमने या लढतीतील विजेता ठरला. तीन मिनिटांच्या या गेममध्ये प्रग्नानंदने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत घोडदौड केली. या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंना जगज्जेता खेळाडू डिंग लिरेनला आव्हान देणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. मॅग्नस कार्लसन याने त्या स्पर्धेमध्ये आपण खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता भारताच्या प्रग्नानंदला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

उपांत्य फेरीच्या लढती

मॅग्नस कार्लसन - निजात एबासोव

फॅबियानो कॅरुआना - आर. प्रग्नानंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Satam Video : मुंबईतील दुर्घटनांचे भाजप शहराध्यक्षांना गांभीर्यच नाही? अमित साटम यांचा हसतानाचा व्हिडिओ व्हायरल, विरोधक आक्रमक

Latest Marathi News Live Update : सामाजिक वनीकरण विभागातील कथित घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे

Koyna Dam Update : कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना धरणात 5 हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक; जिवंत पाणीसाठा 'इतक्या' टीएमसीवर..

Mastani Lake Dry : मस्तानी तलाव अजूनही कोरडा; पाण्याचा प्रश्न गंभीर

Hinjewadi Traffic Issue : हिंजवडीत वाहतुकीसाठी पोलिसांच्या उपाययोजना

SCROLL FOR NEXT