Prakhar Chaturvedi latest news SAKAL
क्रीडा

Prakhar Chaturvedi : एका इनिंगमध्ये ठोकल्या ४०४ धावा! भारताला मिळाला लारा, केली विश्वविक्रमाची बरोबरी

Prakhar Chaturvedi latest news |

Kiran Mahanavar

Prakhar Chaturvedi News : बीसीसीआय अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्नाटकच्या फलंदाजाने इतिहास रचला. मुंबईविरुद्ध खेळताना कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने नाबाद 404 धावा केल्या. या खेळीमुळे प्रखरने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कूचबिहार ट्रॉफीच्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेचा अंतिम सामना सोमवार 15 जानेवारी रोजी कर्नाटकातील केएससीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या. आयुष महात्रेने 145 धावांची शानदार खेळी केली. तर आयुष सचिनने 73 धावांचे योगदान दिले. हार्दिक राजने चार विकेट घेतल्या होत्या.

380 धावांच्या प्रत्युत्तरात कर्नाटक संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर प्रखर चतुर्वेदी आणि कार्तिक एस. यूने पहिल्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. कार्तिक 50 धावा करून बाद झाला. एका टोकाला असलेल्या प्रखारने हर्षिल धर्मानी (169) सोबत भागीदारी करत संघाची धावसंख्या 400 पर्यंत नेली.

प्रखर शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 404 धावांची खेळी खेळली. प्रखरने आपल्या डावात 637 चेंडूंचा सामना केला आणि 46 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्नाटकने 890 धावा करून डाव घोषित केला.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने 2005 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. याशिवाय 1994 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशायरकडून खेळताना डरहमविरुद्ध नाबाद 501 धावा केल्या होत्या. आता भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रखर चतुर्वेदीने एका डावात 400 धावा करून ब्रायन लाराच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT