Maharashtra Kesari
Maharashtra Kesari esakal
क्रीडा

Maharashtra Kesari : सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी

सकाळ डिजिटल टीम

सांगलीः यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तिला चांदीची मानाची गदा सुपूर्द करण्यात आली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कल्याणची वैष्णवी पाटील उपविजेती ठरली आहे. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं.

प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करीत डाव जिंकला. प्रतीक्षाला पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रतीक्षाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडल्या. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT