Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : बॉक्सर प्रिती पवारने जिंकले कांस्य पदक; भारताची पदकसंख्या 62 वर

India's medal tally stands at 62: प्रिती पवारने जिंकले कांस्य पदक...

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 च्या दहाव्या दिवशी भारताच्या पदकसंख्येत अजून एका कांस्य पदकाची भर पडली. भारताची युवा बॉक्सर प्रिती पवारने महिला बॉक्सिंग 54 किलो वजनीगटात कांस्य पदक पटकावले.

प्रिती पवारने महिला बॉक्सिंग 54 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. याचबरोबर तिने भारतासाठी कांस्य पदक निश्चित केले होते. सेमी फायनलमध्यये तिचा सामना चीनच्या चँग युआनसोबत झाला.

या सामन्यात चीनच्या बॉक्सरने प्रितीचा 5 - 0 असा पराभव केला. या्मुळे प्रितीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.

19 वर्षाच्या प्रिती पवारला बॉक्सिंगचा वारसा लाभला आहे. तिचे वडील आणि काका हे बॉक्सिंग कोच आहेत. त्यांनीच प्रितीला बॉक्सिंगसाठी प्रवृत्त केलं. प्रितीने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला बॉक्सर व्हायचं नव्हतं. ती अभ्यासात हुशार होती आणि परिक्षेत नंबरात येत होती.

मात्र तिच्या वडिलांनी आणि काकांनी तिला बॉक्सिंगसाठी प्रवृत्त केलं. सुरूवातीला बॉक्सिंग न आवडणाऱ्या प्रितीला जास्तीजास्त स्पर्धा खेळल्यानंतर बॉक्सिंग आवडू लागलं. प्रितीचे वडील हरियाणा पोलीस दलात सब इन्स्पेक्टर आहेत.

भारताने 10 व्या दिवशी कांस्य पदकाने सुरूवात केली होती. पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडाप्रकारात (नौकानयन) भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी भारताला कांस्य पदक पटकावून दिले. या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला.

तसेच आर्चरीमध्ये महिला कांपाऊट वैयक्तिक प्रकारात भारताने दोन पदके निश्चित केली आहे. सुरेखा आणि आदिती यांनी सेमी फायनल गाठली असून त्या सेमी फायनलमध्ये एकमेकींसोबतच सामना खेळणार आहेत.

त्यामुळे महिला आर्चरीच्या वैयक्तिक प्रकारात भारताचे एक कांस्य आणि एक रौप्य पदक निश्चित आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT