kevin de bruyne esakal
क्रीडा

मँचेस्टर सिटीने लीड्स युनायटेडचा उडवला धुव्वा

अनिरुद्ध संकपाळ

इतिहाद : प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत (Premier League) मँचेस्टर सिटीने (Manchester City) मंगळवारी लीड्स युनायटेडचा (Leeds United) ७ - ० अशा धुव्वा उडवला. फिल फोडेन, जॅक ग्रेलिश आणि केव्हिन डे ब्रुने (Kevin De Bruyne) यांनी केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने पहिल्या हाफमध्येत लीड्स युनायटेडवर ३ - ० अशी आघाडी घेतली होती. (Man City vs Leeds United)

त्यानंतर रियाद माहरेझने दुसऱ्या हाफची सुरुवात आपल्या गोलने केली. त्याने पेनाल्टी एरियामधून मारलेला फटका ज्युनियर फिरपोच्या पायाला लागला आणि लीड्सचा गोलकिपर इलान मेसलियरला चकावा देत गोलपोस्टमध्ये विसावला.

त्यानंतर डे ब्रुनेने सामन्यातला आपला दुसरा गोल दागत सिटीची (Manchester City) आघाडी अणखी वाढवली. सिटीचीने लीड्सवर ५ - ० अशी आघाडी घेतल्यानंतर जॉन स्टोनने मँचेस्टर युनायटेडची हीच आघाडी ६ - ० अशी केली. त्याने लीड्सच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. मात्र त्याचा फटका गोलपोस्टच्या बारला लागला आणि पुन्हा त्याच्याकडेच आला. त्याने गोल करण्याची दुसरी संधी मात्र दवडली नाही. (Man City vs Leeds United)

मँचेस्टर सिटीने लीड्स युनायटेडचा (Leeds United) ७ - ० ने केलेला पराभव हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी लिव्हरपूलने १९९५ - ९६ च्या हंगामात ५ - ० असा पराभाव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT