Prime Minister Narendra Modi Convey Best Wishes To Indian Contingent Of Commonwealth Games  esakal
क्रीडा

CWG 2022 :'मैदान बदलले, तुमची जिद्द नाही' PM मोदींच्या खेळाडूंना शुभेच्छा

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (दि. 20 जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बर्मिंगहम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धात (Commonwealth Games 2022) भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधताना आपले सर्वस्व पणाला लावून खेळा असे सांगितले. याचबरोबर मोदी चेस ऑलिम्पियाड (Chess Olympiad) आणि राष्ट्रकुल स्पर्धा एकाचवेळी सुरू होणार असल्याने भारतीय खेळाडूंकडे जगावर छाप सोडण्याची संधी असल्याचे म्हणाले. मोदींनी खेळाडूंना सांगितले की वेळेच्या अभावामुळे आपण समोरासमोर भेटू शकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तेथून परताल त्यावेळी आपण नक्की भेटू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, 'माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे की मला तुमच्या सर्वांशी भेटण्याची संधी मिळाली. तुमच्यापैकी अनेक लोक हे विदेशात सराव कर आहे. मी देखील संसद सत्रामध्ये व्यग्र आहे. आज 20 जुलै आहे. क्रीडा जगतासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिवस आहे. ज्या दिवशी राष्टकुल स्पर्धा सुरू होणार आहे. त्याच दिवशी तामिळ नाडूमध्ये चेस ऑलिम्पियाड सुरू होणार आहे. भारतीय खेळाडूंकडे जगावर आपली छाप सोडण्याची संधी आहे.'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'तुम्ही मन लावून खेळा, सर्वस्व द्या, संपूर्ण शक्तीनिशी खेळा याचबरोबर कोणताही दबाव न घेता खेळा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आजचा हा काळ भारतीय क्रिकेट इतिहासासाठी एका दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. आज तुमच्यासारख्या खेळाडूंचा आत्वविश्वास जबरदस्त आहे. तुमचा सराव देखील चांगला सुरू आहे. देशात खेळाविषयीचे वातावरण देखील जबरदस्त आहे. तुम्ही सगळे शिखरावर पोहचत आहात. नवे विक्रम करत आहात. जे खेळाडू पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत भाग घेत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मैदान बदलले आहे. तुमचा अंदाज नाही, तुमची जिद्द नाही. उद्येश एकच आहे तिरंगा फडकवणे, राष्ट्रगीताची धुन ऐकणे. त्यामुळे दबाव घेऊ नका चांगल्या आणि दमदार खेळाने इतरांवर छाप सोडा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT