Prithvi Shaw girlfriend Nidhi Tapadiaa social media troll esakal
क्रीडा

Prithvi Shaw: 'पोरी काय येत्यात अन् जात्यात...भावा तु करिअरकडे लक्ष दे'

भावा तु करिअरकडे लक्ष दे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून भारताचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 19 वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकवणारा पृथ्वी शॉ एका अभिनेत्रीसमोर क्लीन बोल्ड झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेटकऱ्यांनी त्याला याच गोष्टीवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'पोरी काय येत्यात अन् जात्यात...भावा तु करिअरकडे लक्ष दे' असा सल्ला नेटकऱ्यांनी शॉला दिला आहे. (Prithvi Shaw girlfriend Nidhi Tapadiaa social media troll)

पृथ्वी शॉने नवरात्रीत गरबा शिकत असतानाचे काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री निधी तापडिया आणि शॉ यांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं. पृथ्वी आणि निधी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

दोघेही सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांनी बर्फातील व्हिडीओ फोटो सोशल अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. दोघांनी एकमेकांच्या पोस्टला कमेंटदेखील केल्या आहेत. शॉने कमेंट बॉक्समध्ये 'तु गुलमर्ग गई कधी गेली होतीस?' असा सवाल उपस्थित केला आहे. त्याच्या या प्रश्नानंतर नेटकऱ्यांनी शॉला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

ट्रेनिंग वर फोकस कर टीम इंडियात स्थान हवे आहे की नाही. बाकीचे खेळाडू बघ. तर दुसऱ्या एका युजरने, भाऊ, मी तुझा मोठा चाहता आहे, पण आधी तुझ्या करिअरवर लक्ष दे, आयुष्यात या गोष्टी येतील.

तेंडुलकर, कोहली, रोहित, माही बघ, त्यांनी आपलं करिअर आधी घडवलं. अशा शब्दात नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

कोण आहे निधी तापडिया?

निधी तापडिया ही इंस्टाग्राम सेन्सेशन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. निधी एक मॉडेल आहे, ती आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळते. निधी तापडियाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 102K फॉलोअर्स आहेत.

काही दिवसांपूर्वी पृथ्वीने निधीबरोबरच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोबरोबरच त्याने हार्ट इमोजीही टाकला होता. त्यामुळे पृथ्वी शॉ निधी तपाडीला डेट करत असल्याची चर्चा होती. पण याबाबत दोघांनीही खुलासा केलेला नाही. याआधी पृथ्वी शॉचं नाव टीव्ही अॅक्ट्रेस प्राची सिंग हिच्याबरोबर जोडलं जात होतं. दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT