Prithvi Shaw-Sapna Gill News
Prithvi Shaw-Sapna Gill News sakal
क्रीडा

Prithvi Shaw : IPL जोमात असताना पृथ्वी शॉ जाणार गजाआड? मुलीच्या विनयभंग प्रकरणी अडचणी वाढल्या

Kiran Mahanavar

Prithvi Shaw-Sapna Gill : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉविरुद्ध मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. ही घटना गेल्या वर्षी घडली होती, त्यावर न्यायालयाने आता हा निर्णय दिला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया स्टार सपना गिल यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर काही व्हिडिओही व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

एकीकडे पृथ्वी शॉने सपनाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे सपना गिलने क्रिकेटपटूवर विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने आता पृथ्वी शॉविरुद्ध सपना गिलच्या विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

महानगर दंडाधिकारी एस. सी. तायडे यांनी पोलिसांना 19 जूनपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. शॉ आणि इतरांविरुद्ध एफआयआर न नोंदवल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याची गिलची याचिका न्यायालयाने मात्र फेटाळली.

पृथ्वी शॉने अंधेरीतील एका पबमध्ये तिचा विनयभंग केल्याचा आरोप गिलने केला होता. मात्र शॉ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

गेल्या वर्षी, पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सेल्फी घेण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शॉवर हल्ला केल्याप्रकरणी गिलला इतरांसह अटक करण्यात आली होती. सपना गिल सध्या जामिनावर आहे.

जामीन मिळाल्यानंतर तिने शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अंधेरी विमानतळ पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्याने मॅजिस्ट्रेट कोर्टाचा आसरा घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT