Pro Kabaddi sakal
क्रीडा

Pro-Kabaddi : सात ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीचा दम घुमणार

यू-मुंबा-दबंग दिल्लीमध्ये सलामीची लढत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या आगामी मोसमाचे बिगुल वाजले आहे. बंगळूरमधील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये या मोसमातील पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून पुणे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या लीगचा मोर्चा वळणार आहे. या स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्टस्‌ यांच्याकडून याबाबतची घोषणा बुधवारी करण्यात आली.

या मोसमात प्रो-कबड्डी लीगच्या लढती स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसांतच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रो-कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दर शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.

सलामीची लढत गतविजेता दबंग दिल्ली-यू मुंबा यांच्यामध्ये रंगणार असून त्याच दिवशी दुसरा सामना बंगळूर बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात तर युपी योद्धाज-जयपूर पिंक पँथर्स यांच्यात तिसरा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या तिकिटाचे बुकिंग www.prokabaddi.com या सांकेतिक स्थळावर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलुचिस्तानचं नवं चलन 'बलोची फालूस' नेमकं काय? भारताच्या १००० रुपयांचे किती होतील?

'तू भारतासाठी भरपूर केलंस...'; गौतम गंभीरचा 'हिटमॅन' रोहित शर्माला मॅसेज, India vs England मालिका शेवटची? नेमकं काय घडलं?

आदेश बांदेकर तुमच्याही घरी येऊ शकतात! झी मराठीच्या 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं? फक्त एक गोष्ट

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

KashiVishwanath-BHU : काशी विश्वनाथ धामचा परिणाम! BHU मध्ये पर्यटन शिक्षणासाठी नवे केंद्र, पदवी ते PhD पर्यंत अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT