Pro Kabaddi League  sakal
क्रीडा

Pro Kabaddi लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार

प्रो कबड्डीचा मुंबईत लिलाव; ५०० पेक्षा अधिक खेळाडूंवर लागणार बोली

Kiran Mahanavar

Pro Kabaddi : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्‌स यांच्यावतीने प्रो कबड्डी लीगच्या लिलावाचे बिगुल शुक्रवारी वाजले. मुंबईमध्ये येत्या ५ व ६ ऑगस्ट रोजी या स्पर्धेसाठीच्या कबड्डीपटूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये ५००हून अधिक कबड्डीपटूंवर बोली लावण्यात येणार आहे.

प्रो कबड्डी लीगच्या लिलावासाठी चार प्रकारांत कबड्डीपटूंची विभागणी करण्यात येणार आहे. युवा कबड्डीपटू, स्थानिक कबड्डीपटू व परदेशी कबड्डीपटू अशा प्रकारे ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चार गटांमध्ये कबड्डीपटूंची विभागणी करण्यात येणार आहे. गट व मूळ किंमत अनुक्रमे ३० लाख, २० लाख, १० लाख व ६ लाख अशी आहे. तसेच प्रत्येक गटात अष्टपैलू, आक्रमकपटू व बचावपटू अशीही विभागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीगचा हंगाम कोरोनामुळे बंगळूर येेेथे हॉटेलमध्ये घेण्यात आला होता. ज्यामध्ये ‘दबंग दिल्ली’ने विजेतेपद पटकाविले होेते.

कबड्डीपटूंना संघात कायम ठेवता येणार

मागील मोसमात आपल्या संघाकडून खेळलेल्या कबड्डीपटूंना कायम ठेवण्याची संधीही फ्रॅंचायजींकडे असणार आहे. सहा कबड्डीपटू आपल्या संघात त्यांना ठेवता येणार आहेत. तसेच युवा खेळाडूंमधून चार खेळाडूंना अशी संधी दिली जाणार आहे.

खेलो इंडियातील खेळाडूंनाही संधी

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात यंदा खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी झालेल्या कबड्डीपटूंनाही सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत अव्वल दोन स्थानांवर राहिलेल्या २४ कबड्डीपटूंना लिलावात सहभागी करवून घेतले आहे. या लिलावासाठी प्रत्येक फ्रॅंचायजींना ४.४ कोटी खर्च करण्याची मुभा असणार आहे.

गट व मूळ किंमत

  • अ- ३० लाख

  • ब- २० लाख

  • क- १० लाख

  • ड- ६ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT