क्रीडा

Pro Kabaddi: पटना पायरेट्सची झुंज अपयशी! अवघ्या १ पॉईंटने दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

सध्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा ताफा मुंबईमध्ये धडकला आहे. मुंबई लेगच्या पहिल्या दिवशी पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली या संघांमध्ये थरारक सामना बघायला मिळाला.

Manoj Bhalerao

Pro Kabaddi Patna Pirates vs Dabang Delhi: सध्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा ताफा मुंबईमध्ये धडकला आहे. मुंबई लेगच्या पहिल्या दिवशी पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली या संघांमध्ये थरारक सामना बघायला मिळाला.

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पूर्वार्धातील 13गुणांच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात जबरदस्त पुनरागमन करूनही पटना पायरेटस संघाला दबंग दिल्ली कडून महत्वपूर्ण सामन्यात 37-38 असा केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला.

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत दबंग दिल्लीकडून आशू मलिक(10गुण), पटना पायरेटस कडून सचिन (10गुण) आणि सुधाकर (9गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.

त्याआधी पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दबंग दिल्ली संघाने पटना पायरेटस वर 10व्या मिनिटाला पहिला आणि सहाव्या मिनिटांनी दुसरा असे सलग दोन लोन चढविले.

दबंग दिल्लीच्या मलिक, नीतू शर्मा आणि मनजीत यांनी पूर्वार्धात 20चढायात 13गुण मिळवले. मलिकने मध्यातरांपूर्वी एक सुपर रेड करताना आपली एकदाही पकड होऊ दिली नाही. सचिनने अनेकदा पायरेटसना पुनरागमनाची संधी मिळवून दिली होती. परंतु दिल्लीने आपले वर्चस्व कायम राखताना मध्यंतराला 13गुणांची आघाडी मिळवली.

उत्तरार्धात पटना पायरेटस च्या बचाव पटूना सुर गवसला आणि दबंग दिल्ली वर लोन चढवाताना पटना संघाने आपली पिछाडी सहा गुनांपर्यंत कमी केली. सचिनने सुपर रेड करताना पटना संघाला बरोबरीची संधी मिळवून दिली.

सचिन आणि सुधाकर यांच्या चढाया मुळे पटना संघाची पिछाडी केवळ तीन गुणांचीच राहिली होती. एका क्षणी पटना संघ बाजी मारण्याची चिन्हे होती. परंतु दिल्ली च्या खेळाडूंनी सायम राखताना केवळ एक गुणाने विजयाची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT