भारतीय तिरंदाजी संघटना 
क्रीडा

तिरंदाजी निवडणुकीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय तिरंदाजीतील संघटनात्मक वाद मिटण्याच्या दिशेने पहिले पाऊल शुक्रवारी उचलले गेले. दोन गटांचे विलीनीकरण करून एकत्रित निवडणूक घेण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर समिती नेमली आहे. त्यामुळे भारतीय तिरंदाजांचा ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील सहभाग सुकर होऊ शकेल.

अर्जुन मुंडा आणि बी. व्ही. पी. राव यांनी एकाच वेळी दोन स्वतंत्र निवडणुका घेतल्यामुळे तिरंदाजी संघटनेची सूत्रे कोणाकडे, हा प्रश्न कायम राहिला होता. या संदर्भातील सुनावणी यापूर्वी लांबणीवर पडली होती, आजही हेच घडेल अशी चिन्हे दिसत होती; पण अखेर न्यायालयाने हा प्रश्न मिटवण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.

माजी निवृत्त न्यायाधीश असलेल्या या समितीत सरकार; तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असतील. त्याचबरोबर मुंडा आणि राव या प्रतिस्पर्धी गटास एक प्रतिनिधी नेमण्याची सूचना केली. या समितीची पहिली बैठक 17 ऑगस्टला होईल, असेही जाहीर केले आहे. त्या बैठकीत निवडणूक घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? खासदारांनंतर आता आमदारही शिंदेंच्या वाटेवर? बैठकीला चार आमदारांची दांडी

IPL 2027 Trade : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एक खळबळ! 'स्टार' खेळाडूला थेट कर्णधारपदाची ऑफर, त्याच्या भूमिकेकडे लक्ष...

हातात सिगारेट अन् बाजुला दारुची बॉटल...! भररस्त्यात तरुणीचा राडा, रस्ता केला ब्लॉक; मोठी वाहतूककोंडी, Video Viral

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

Latest Marathi News Live Update : बारामतीच्या पूर्व भागात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT