PSG Superstar Neymar Jr announces pregnancy with model Bruna Biancardi  
क्रीडा

Neymar Jr : मॉडेल ब्रुना गरोदर! PSG सुपरस्टार नेमार दुसऱ्यांदा होणार बाप

रोहित कणसे

ब्राझिलीयन स्टार फुटबॉलर आणि पीएसजी नेमार हा लवकरच बाप बनणार आहे. नेमार आणि त्याची गर्लफ्रेंड यांनी नुकतेच आपल्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. यानंतर चाहते त्यांच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

नेमार आणि त्याच्या गर्लफ्रेडने 2022 मध्ये त्यांच्या नात्याबद्दल माहिती दिली होती. नेमारच्या प्रेयसीला मूल झाल्यास, त्याच्या नवीन गर्लफ्रेंडसोबत हे त्याचे पहिले अपत्य असेल.

31 वर्षीय नेमारला आधीच 11 वर्षांचे मूल आहे. त्याचे नाव शॉन डेव्ही लुका आहे. नेमार त्याची माजी प्रेयसी कार्लोना डेंटाससोबत आधीच पिता बनला आहे. त्यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते.

नेमारला वयाच्या 19 व्या वर्षी त्याची तत्कालीन मैत्रीण कॅरोलिना डांटाससोबत पहिले मूल झाले. बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेन सोबत असताना त्याचा मुलगा डेव्ही लुका हा अनेकदा त्याच्यासोबत दिसला आहे. नेमारचे हे दुसरे अपत्य असेल.

दरम्यान मॉडेल ब्रुना बियानकार्डी एक साओ पाउलो-बेस मॉडेल आणि सोशल मीडिया एन्फ्लुअंसर आहे ज्याची स्वतःची कपड्यांचा ब्राँड देखील आहे. आता नेमारच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत काही सुंदर फोटो शेअर करत गुड न्यूज दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT