Kieron Pollard
Kieron Pollard 
क्रीडा

Kieron Pollard: ८०० सिक्स अन् 12000 रन्स….कायरन पोलार्डची पाकमध्ये तुफान फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने पीएसएल २०२३ मध्ये मुलतान सुल्तान्सकडून खेळताना T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पोलार्डने लाहोर कलंदर्सविरुद्ध २८ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३९ धावांची धडाकेबाज खेळी केली. यासोबत पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. इतकेच नव्हे तर 12 हजारहून अधिक धावा करणारा पोलार्ड जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. (PSL 2023 Kieron Pollard 800 SIX 12000 runs t20 cricket lahore qalandars vs multan sultans )

कायरन पोलार्ड सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय. त्याने पीएसएलच्या 20 व्या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. पाकिस्तानात खेळताना कायरन पोलार्डने टी २० क्रिकेटमध्ये आपले 800 सिक्स पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा हा माजी कॅप्टन पीएसएल लीगमध्ये मुल्तान सुल्तांसकडून खेळत होता. त्याने 3 सिक्स मारले.

कायरन पोलार्डचे टी २० क्रिकेटमध्ये ८००सिक्स पूर्ण झाले आहेत. पोलार्डने करिअरमधील ५५० व्या टी २० सामन्यात हा टप्पा गाठला.

यापूर्वी, वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हे एकमेव फलंदाज आहेत ज्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये हा टप्पा ओलांडला आहे.

पोलार्डने पीएसएलच्या सामन्यात करिअरमधील दोन महत्त्वाचे टप्पे गाठले. पण तो लाहोर विरुद्ध आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. लाहोर कलंदर्सने 20 ओव्हर्समध्ये 180 धावा केल्या होत्या. मुल्तान सुल्तांसच्या टीमने 159 धावा केल्या. पोलार्डने सर्वाधिक 39 धावांच योगदान दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT