PSL Shahnawaz Dahani Unique Celebration  esakal
क्रीडा

VIDEO: आफ्रिदीला बोल्ड करणाऱ्या शाहनवाजचे सेलिब्रेशन पोहोचले पॅव्हेलियनपर्यंत

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League 2022) मुल्तान सुल्तान आणि लाहोर कलंदर्स यांच्यात गद्दाफी स्टेडियमवर सामना रंगला. मुल्तान सुल्तानने सामना 28 धावांनी जिंकला. या सामन्याचा हिरो हा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी टिपले. यातील लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदीची (Shaheen Afridi) घेतलीली विकेट खास ठरली. याचबरोबर विकेट घेतल्यानंतर शाहनवाजने केलेले सेलिब्रेशनही चर्चेचा विषय ठरला.

शाहनवाजने लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदीचा त्रिफळा उडवल्यानंतर जाम खूष झाला. सामन्याचे 18 वे षटक टाकण्यासाठी मुल्तान सुल्तानच्या कर्णधाराने शाहनवाजला पाचारण केले. त्यावेळी लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदी क्रीजवर होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर शाहनवाजला आफ्रिदीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चेंडूने त्याला चकवा दिला आणि त्याच्या यष्ट्या उखडल्या गेल्या.

आफ्रिदीला बाद केल्यानंतर शाहनवाज भलताच खूष झाला. तो मैदानात बोट दाखवत पळत होता. पळता पळता तो पॅव्हेलियनपर्यंत पोहचला. शाहनवाजचे या अनोख्या सेलिब्रेशन पाहता त्याने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरला देखील मागे टाकले असे म्हणावे लागेल. शाहनवाजच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पीएसएलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT