PT Usha 
क्रीडा

PT Usha : अकॅडमीवर अवैध कब्जा,... खासदार पीटी उषा पत्रकारांसमोरच रडली

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा सध्या चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा सध्या चर्चेत आली आहे. पत्रकरांशी संवाद साधताना तिला अश्रु अनावर झाले. 'माझ्या अकादमीचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत ती पत्रकारांसमोरच रडली.

पीटी उषा हिने उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स अकादमीच्या कंपाऊंडमध्ये अवैध बांधकाम होत असल्याचा आरोप केला आहे. तिने याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे.

रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

पीटी उषा हिची उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स अत्याधुनिक सुविधांसह संभाव्य स्तरांवर खेळांचा प्रचार आणि सराव वाढवण्यासाठी कार्यरत आहे. दरम्यान, तिच्या अकादमीच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाल्या पीटी उषा?

पीटी उषा शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होती. काही लोक विद्यार्थिनींच्या कॅम्पसमध्ये घुसले. रात्रीच्या वेळीही अनेकजण नशेच्या अवस्थेत प्रवेश करतात. येथे त्रास होतो. हे सांगताना ती भावूक झाली. तिला अश्रु अनावर झाले. आपल्याला सातत्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोपही तिनं यावेळी केला.

'उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स' अकादमी केरळमधील कोझिकोड येथे आहे. अनेक विद्यार्थिनी आणि खेळाडू येथे प्रशिक्षण घेतात. पीटी उषा सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.

'काही लोक उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सच्या कंपाऊंडमध्ये घुसले आणि त्यांनी तेथे बांधकाम करणे सुरू केले. व्यवस्थापनाने त्यांना विरोध केला असता त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांनी त्यांच्याकडे पानगड पंचायतीची परवानगी असल्याचा दावा केला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर काम थांबवण्यात आले. असही पीटी उषाने सांगितले.

राज्यसभेच्या सदस्य झाल्यानंतर यात वाढ झाली आहे. उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सला गेल्या अनेक दिवसांपासून अशा छळ आणि सुरक्षेच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अशी खंतही पीटी उषाने व्यक्त केली आहे.

याप्रकरणी पीटी उषा हिने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. पीटी उषा हिला जुलै 2022 मध्ये भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद

SCROLL FOR NEXT