Yoga In Asian Games Sakal
क्रीडा

Yoga In Asian Games : ‘योगा’चा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश होणार; आशियाई कौन्सिलकडून हिरवा कंदील - पी. टी. उषा

PT Usha : ऑलिंपिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (ओसीए) कार्यकारी मंडळाकडून ‘योगा’च्या समावेशाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ­­: प्राचीन भारतातील आध्यात्मिक व शारीरिक शास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘योगा’चा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश होणार आहे, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी सोमवारी दिली.

ऑलिंपिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (ओसीए) कार्यकारी मंडळाकडून ‘योगा’च्या समावेशाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून क्रीडा समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. या बैठकीत ‘योगा’च्या समावेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ओसीएचे प्रभारी अध्यक्ष रणधीर सिंग यांनी कार्यकारी मंडळाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘योगा’चा समावेश करण्यात आल्याची माहिती पी. टी. उषा यांना दिली. भारताकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

त्यामुळे पी. टी. उषा यांच्याकडून त्यांना धन्यवाद सांगण्यात आले. दरम्यान, याआधी भारतामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून योगासनांची स्पर्धात्मक खेळ म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताच्या पुढाकाराने आता ‘योगा’ जागतिक क्रीडामध्येही नावारूपाला येण्याचा प्रयत्न करीत आहे.

पदक की प्रात्यक्षिक?

‘योगा’चा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात येणार आहे हे पक्के असले तरी खेळ म्हणून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ‘योगा’ ची पदकासाठी निवड केली जाईल की प्रात्यक्षिक खेळ म्हणून वापर केला जाईल, याबाबत अद्याप निश्‍चित ठरवण्यात आलेले नाही. सर्वसाधारण बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे, पण पी. टी. उषा यांनी ‘योगा’ चा पदकासाठीच समाविष्ट केला जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT