marathon
marathon 
क्रीडा

9 डिसेंबरची धावाधाव कुटुंबासाठी!

मुकुंद पोतदार

पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनला पुणेच नव्हे तर राज्यभरातून लक्षवेधी प्रतिसाद मिळू लागला आहे. सहकुटुंब सहपरिवार धावण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अनेक कुटुंब सक्रियसुद्धा झाले असून, नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या शर्यतीसाठी त्यांचा सराव जोरात सुरू आहे. पुण्यातील उत्कर्ष-अस्मिता इनामदार यांनी अर्धमॅरेथॉनचे लक्ष्य ठेवले असून, मेघा-तनिष्का या दोन मुली सहा किमी अंतराची फॅमिली रन धावणार आहेत. 

उत्कर्ष-मेघा यांनी सप्टेंबरमध्ये सातारा हिल मॅरेथॉनमधील हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. त्यासाठी त्यांना तीन तास 47 मिनिटे लागली. ही त्यांची दुसरीच हाफ मॅरेथॉन असेल. या वाटचालीबद्दल मेघाने सांगितले, की आम्ही जोडीने धावतो. त्यामुळे एकमेकांपासून फार पुढे जात नाही. शर्यत पूर्ण करणे महत्त्वाचे असते हे सूत्र आम्ही लक्षात ठेवतो. 

इनामदार कुटुंबाने दोन वर्षांपूर्वीच धावायला सुरवात केली आहे. ही सुरवात कशी झाली याविषयी उत्कर्षने सांगितले, की मी केपीआयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझे बॉस शशिभूषण कोल्हे मॅरेथॉनपटू आहेत. त्यांना सपोर्ट म्हणून कंपनीतील काही जणांना धावायला सुरवात केली. त्यातूनच मग गोडी लागली. 

मेघा एसपी कॉलेजला कॉमर्सच्या पहिल्या वर्षात, तर तनिष्का ही पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत आहे. 

मुलींची महत्त्वाकांक्षा वाढली 
धावायला लागल्यापासून मुलींनी अभ्यास करावा म्हणून घरात त्यांच्या मागे वेगळे धावावे लागते का, या प्रश्नावर मेघाने हसून सांगितले, की तशी वेळच येत नाही. आमच्या द पुणे दक्षिण स्ट्रायडर्स या आमच्या ग्रुपमध्ये डॉक्‍टर, वकील, सीए अशी मंडळी आहेत. त्यांच्याशी आमची मैत्री जमली आहे. आपल्या आई-वडिलांचे मित्र इतके शिकलेले आहेत आणि त्यांना समाजात मानाचे स्थान आहे हे कळण्याइतकी समज त्यांना आली आहे. धावणे मनापासून करतो तर मग अभ्यासच नव्हे, तर इतरही गोष्टी मनापासून करता येतात हे त्यांच्या लक्षात आले असून, त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा वाढली आहे. 

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यामागे एलिट धावपटू नव्हे तर फॅमिली रन आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य केंद्रस्थानी आहे. सहल, स्नेहभोजन किंवा लॉंग ड्राइव्ह अशा निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबाला आमची फॅमिली रन एक सकारात्मक निमित्त ठरेल. धावण्याची सुरवात तुमच्या घरापासून सुरू व्हायला हवी. त्यासाठी आम्ही भरीव प्रयत्न करीत असून त्यास यश येत आहे. फॅमिली रन ही आमच्या उपक्रमाची ओळख अन्‌ मुख्य वैशिष्ट्य ठरेल. 
- विवेक सिंग, बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचे सीईओ

मॅरेथॉनसंबंधी महत्त्वाची माहिती :
गट :
6 किलोमीटर फॅमिली रन, 10 किमी, 21 किमी
नोवनोंदणीसाठी : www.bajajallianzphm.com
अधिक माहितीसाठी : info@punehalfmarathon.com
मोबाईल : 9172598860

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT