महादेव घुगे sakal
क्रीडा

Pune : महादेव घुगे फौजी, धावण्यात मनमौजी

मॅरेथॉन, आयर्नमॅनमध्ये हजारावर पदकांचा प्रेरणादायी मनसबदार

मुकुंद पोतदार

पुणे : कोणत्याही व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात त्याच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये डोकावतात. तशा छटाही दिसतात. जवान अर्थात फौजी भेटल्यास आणि त्याचा सहवास काही क्षण लाभला तरी तुम्हाला स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. एखादा फौजी मनापासून धावणारा आणि त्यासाठी ट्रेनिंगची मजा लुटणारा असेल तर तो कसा दिसेल याचे कल्पनाचित्र साकारण्यासाठी तुमच्यासमोर कर्नल महादेव घुगे यांची व्यक्तिरेखा उभी करावी लागेल.

ते मुळचे अकोल्याचे असून त्यांना हेवा वाटावे आणि पर्यायाने लहानपण देगा देवा ही उक्ती लागू ठरावी असे बालपण मिळाले. याविषयी ते सांगतात की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये अभ्यासापेक्षा मला हुंदडण्यात जास्त गती होती. मी मध्यम-लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतींत सहभागी व्हायचो. शाळेच्या हॉकी, फुटबॉल संघातही मी होतो. सातवीपासून दहावीपर्यंत मी सुमारे तीस पदके जिंकली. बारावीनंतर माझी लष्करात निवड झाली.

लष्करात भरती झाल्यानंतर अनेक खेळ खेळण्याची आणि त्यातून आवडीचा किंवा चांगली क्षमता असलेला क्रीडाप्रकार निवडण्याची संधी मिळत असते. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, डेहराडूनमधील इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत (आयएमए) ट्रेनिंग घेताना मी गोल्फ सोडून प्रत्येक खेळ खेळलो. त्यावेळी सामान्य जवानांना पीटी-ड्रील करावे लागायचे. आम्ही क्रीडापटू कधी बास्केटबॉल कोर्ट, तर कधी हॉकीच्या मैदानावर असायचो. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, लोणावळ्यातील नौदल अॅकॅडमी, सिकंदराबादमधील हवाई दलाची अॅकॅडमी येथेही स्पर्धांच्या निमित्ताने खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी ब्रिटनची सँडहर्स्ट अॅकॅडमी आणि अमेरिकेची उस्मा (युनायटेड स्टेट््स मिलिटरी अॅकॅडमी) यांच्याविरुद्धच्या स्पर्धांतही सहभागाची संधी मिळाली.

पन्नाशी पार केलेले घुगे चाळीच्या उंबरठ्यावर मॅरेथॉन, आयर्नमॅनकडे वळले. पहिल्या स्पर्धेच्या अनुभवाविषयी ते सांगतात की, दिल्लीत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा यमुना नदीला समांतर असलेल्या कालव्यात पोहायचे होते. तेव्हा पोहण्याचा शास्त्रशुद्ध सराव मी केला नव्हता. मात्र गावाकडे मोरणा नदीला पूर आल्यानंतर आम्ही झाडावरून उड्या मारायचो. राजुरा-सुकांडा या गावांमधून ही नदी जाते. तेव्हा पूल नव्हता. त्यामुळे नदीत पोहण्याचा अनुभव कामी आला. दिल्लीतील थंडी बघता कालव्यात पोहण्याचे आव्हान त्यामुळेच पेलता आले.

कर्नल घुगे यांनी बेळगावमध्ये कमांडो ट्रेनिंग घेतले आहे. ४५ दिवसांच्या ट्रेनिंमध्ये पहिले दोन आठवडे झोपायला मिळते. नंतर दोनच तास झोपता येते. काश्मीरमध्ये देशासाठी सेवा करण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. २०१४ मध्ये त्यांना लष्कराच्या उत्तर विभागाचे तत्कालीन कमांडर जनरल ए. के. सहानी यांच्याहस्ते पदक मिळाले.

जवानांना कौटुंबिक पातळीवर अनेक त्याग करावे लागतात. याविषयी ते सांगतात की, माझी पत्नी अनुराधा अनेक वेळा स्पर्धांना येते. मोठा मुलगा १९ वर्षांचा असून त्याने नुकतीच कोल्हापूरची स्पर्धा जिंकली. दुसरा मुलगा १६ वर्षांचा असून तो अॅथलेटीक्स करतो.

मॅरेथॉन, आयर्नमॅनमध्ये हजारापेक्षा जास्त पदके जिंकलेले कर्नल घुगे, प्रेरणा कशी मिळते, या प्रश्नावर देशबांधवांना श्रेय देतात. सिव्हीलनय आम्हाला मान देतात. आमच्याकडून त्यांना अपेक्षा असते. लष्कराविषयी उत्सुकता असते. त्यांना आमचा अभिमान वाटतो. ते आपुलकी सुद्धा दाखवितात. त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते.

खेडे असो किंवा महानगर, कुठेही धावता येते

धावण्याविषयी कर्नल घुगे सांगतात की, हा एक असा क्रीडाप्रकार आहे की तो तुम्ही कुठेही करू शकता. खेड्यात असाल किंवा महानगरात, पाऊस असो किंवा थंडी, ट्रॅक असो किंवा मातीचे मैदान...असे कोणतेही निकष तेथे आड येत नाहीत. जो धावण्यात भक्कम तो कोणत्याही खेळात बलाढ्य बनतो.

खेडे असो किंवा महानगर, कुठेही धावता येते

धावण्याविषयी कर्नल घुगे सांगतात की, हा एक असा क्रीडाप्रकार आहे की तो तुम्ही कुठेही करू शकता. खेड्यात असाल किंवा महानगरात, पाऊस असो किंवा थंडी, ट्रॅक असो किंवा मातीचे मैदान...असे कोणतेही निकष तेथे आड येत नाहीत. जो धावण्यात भक्कम तो कोणत्याही खेळात बलाढ्य बनतो.

किमान पाच किमी धावल्यावरच न्याहारी

फौजी म्हटल्यावर करडी शिस्त अंगी बाणवलेली असते. याचा खेळात किती फायदा झाला, या प्रश्नावर कर्नल घुगे म्हणाले की, मी रोज किमान पाच किलोमीटर धावतो आणि त्यानंतरच न्याहारी घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT