क्रीडा

८५ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याची पृथा वर्टीकर विजेती

अंतिम लढतीत नाशिकच्या तनिषा कोटेचावर मात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोलकत्ता येथे नुकत्याच झालेल्या ८५ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पुण्याच्या पृथा वर्टीकरने पटकाविले. कोलकता येथे संपलेल्या या स्पर्धेत पृथा वर्टीकरच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले होते. या यशात सतरा वर्षीय पृथा वर्टीकरचा मोलाचा वाटा होता. त्यापाठोपाठ पृथा वर्टीकरने एकेरीतही जोरदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वेळी तिला या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. ८४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पृथा वर्टीकरला सुहाना सैनीकडून हार पत्करावी लागली होती.

अंतिम लढतीत पृथा वर्टीकर समोर महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचाचे आव्हान होते. तनिषा कोटेचाने कडवी लढत दिली मात्र, पृथा वर्टीकरने ११-६, ७-११, ११-७, ११-७, ७-११, ११-६ अशी बाजी मारली. पहिली गेम पृथाने जिंकली. त्यानंतर, दुसरी गेम तनिषाने जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, फॉर्मातील पृथाने सलग दोन गेम जिंकून ३-१ अशी आघाडी घेतली होती. आव्हान राखण्यासाठी तनिषा कोटेचाला पाचवी गेम जिंकणे गरजेचे होते. या गेममध्ये तनिषाने झुंज देऊन बाजी मारली. मात्र, त्यानंतर सहावी गेम जिंकून पृथा वर्टीकरने विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पृथा वर्टीकरने दिल्लीच्या लक्षिता नारंगला ७-११, १२-१०, ११-९, ११-४, ६-११, ११-६ असे, तर तनिषा कोटेचाने महाराष्ट्राच्याच सायली वाणीला ६-११, ११-४, ११-७, ११-३, ८-११, १३-११ असे पराभूत केले होते.

पृथा वर्टीकरला ‘लक्ष्य’चे पाठबळ लाभले आहे. ती शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये बारावीत वाणिज्य विभागात शिकत असून कोथरूड येथील चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीत सौमेन साहाच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये पृथा वर्टीकरने प्रथमच विजेतेपद पटकावले.

पृथा वर्टीकरने चौथ्यांदा राष्ट्रीय स्तरावर जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी पृथा वर्टीकरने विजयवाडा आणि पंचकुलाला झालेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धांतील १९ वर्षांखालील मुलींत सुवर्णपदके पटकावली होती. त्याआधी, तिने भोपाळला झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींत जेतेपद पटकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: उकाडा दूर होणार, मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार; आएमडीचा सतर्कतेचा इशारा

Amravati: फ्रेजरपुरा हादरला! १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; अमरावतीत खळबळजनक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रोज सकाळी फक्त १०० उड्या मारा; शरीरात दिसतील असे बदल की तुम्हीही थक्क व्हाल, यास्मिन कराचीवालांचा खुलासा

Light Bill Saving Tips : रात्रभर AC, फॅन चालवूनही वाढवणार नाही वीजबिल; वापरुन पाहा 'या' 7 पैकी एक ट्रिक

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

SCROLL FOR NEXT